नगराध्यक्ष यांच्या दोन मतामुळे उपाध्यक्षपदी दत्त दिगंबर वानखेडे यांची वर्णी. भाजपला सत्तेपासून दूर, ठेवण्यात यश; नगराध्यक्षांच्या ‘कास्टिंग वोट’ने फिरवली गणिते. ढाणकी प्रतिनिधी:
नगराध्यक्ष यांच्या दोन मतामुळे उपाध्यक्षपदी दत्त दिगंबर वानखेडे यांची वर्णी.
भाजपला सत्तेपासून दूर, ठेवण्यात यश;
नगराध्यक्षांच्या ‘कास्टिंग वोट’ने फिरवली गणिते.
ढाणकी प्रतिनिधी:
गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या ढाणकी नगरपंचायतच्या उपाध्यक्षपदाचा पेच अखेर सुटला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत ढाणकी नगर विकास आघाडीने बाजी मारली असून, दत्त दिगंबर वानखेडे यांची नगरपंचायतच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. १४ जानेवारी रोजी पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेत राजकीय गणिते कमालीची बदललेली पाहायला मिळाली. नगरपंचायत निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. १७ सदस्यांच्या या सभागृहात भाजपाकडे ७ जागा होत्या, तर दोन अपक्षांना सोबत घेऊन त्यांनी ९ सदस्यांचे संख्याबळ उभे करून ढाणकी शहर विकास आघाडी स्थापन केली होती. दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) ३, एम.आय.एम. ३ आणि काँग्रेस २ आणि नगराध्यक्ष यांना धरून 9 सदस्यांची ढाणकी नगर विकास आघाडी तयार झाली होती.
दोन्ही बाजूंकडे ९-९ (नगराध्यक्षांसह) असे समसमान संख्याबळ झाल्याने निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा अर्चना सुंदरकांता वासमवार यांनी आपल्या विशेष अधिकारातील ‘निर्णायक मताचा’ वापर महाविकास आघाडीच्या बाजूने केल्याने सत्तेचे पारडे फिरले आणि दत्तदिगंबर वानखेडे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा अर्चना वासमवार यांनी काम पाहिले, यावेळी मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांनी चोख कर्तव्य पार पाडले.
उपाध्यक्ष निवडीसोबतच स्वीकृत सदस्यांच्या नावावरही शिक्कामोर्तब करण्यात आले. यामध्ये: भाजप गटाकडून रोहित वर्मा, महाविकास आघाडीकडून संजय सल्लेवाड यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपची सत्ता हुकली
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या केवळ नगराध्यक्षाच निवडून आल्याने राजकीय जुळवाजुळव करणे मोठे आव्हान होते. भाजपने सुरुवातीला अपक्षांना सोबत घेऊन आघाडी घेतली होती, परंतु सत्तेची अंतिम गणिते जुळवण्यात दत्त दिगंबर वानखेडे यशस्वी ठरले. या निकालामुळे भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले असून ढाणकी नगर विकास आघाडीने आपला गड राखला आहे. या विजयानंतर नवनियुक्त उपाध्यक्ष दत्त दिगंबर वानखेडे यांच्या समर्थकांनी ढाणकी शहरात मोठा जल्लोष साजरा केला.



