ग्रामीण भागातील समाजामध्ये ‘ पत्रकारांनी ‘ कार्य करावे – चितांगराव कदम : नागापुर (प ) येथे उमरखेड तालुक्यातील पत्रकारांचा सम्मान सोहळा : प्रतिनिधी । उमरखेड
ग्रामीण भागातील समाजामध्ये ‘ पत्रकारांनी ‘ कार्य करावे – चितांगराव कदम
: नागापुर (प ) येथे उमरखेड तालुक्यातील पत्रकारांचा सम्मान सोहळा :
प्रतिनिधी । उमरखेड :
19 व्या शतकात मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी समाजामधील काही चढ उतार असेल ते कार्य त्यांनी आपल्या दर्पण वृत्तपत्रातून मांडून समाजाला आरसा दाखविण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे या पिढीतील पत्रकारांनी सुद्धा गावागावातील समाजामध्ये योग्य दिशा दाखविण्याचे कार्य करावे असे आवाहन माजी जि . प . सदस्य चितांगराव कदम यांनी केले .
तालुक्यातील स्मार्ट गाव नागापुर (प ) येथील राजीव गांधी भवनात आयोजीत पत्रकार सम्मान सोहळ्यात ते बोलत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी पं . स . सभापती सविता कदम ह्या होत्या तर विचारपिठावर महात्मा फुले दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष मुडे, दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे अध्यक्ष साहेबराव धात्रक, प्रादेशिक विभागीय दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षा सविता चंद्रे, सरपंच गोदाजी जाधव, मुख्याध्यापिका छायाताई चापकोरे यांची उपस्थिती होती .
उमरखेड तालूका भौगोलिक दृष्ट्या मोठा असूनही तालूक्यातील पत्रकार बांधव घरावर तुळशीपत्र ठेवून समाजात जे दिसते व जे ते समाजहिताचे ऐकतात यावर लिखानाचा भर हा त्यांचा असून नागापुर (प ) गावाच्या विकास कार्याचाही गौरव त्यांनी समाजासमोर मांडला. त्यामुळे अनेक पुरस्कार प्राप्त असलेल्या नागापुर (प ) च्या पुरस्कारात त्यांचेही मोलाचे योगदान असल्याचे चितांगराव कदम यांनी सांगून त्यांनी दिवंगत राज्याचे मंत्री आर . आर . पाटील यांचा उल्लेख करित सांगीतले की, एका दुरदृष्टी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी ध्येय धोरणे आखणाऱ्या नेत्याला मुकलो असून खेडेगावासाठी त्यांच्या डोक्यात भन्नाट कल्पना होत्या. ज्या गावाला यशवंत ग्राम समृद्धी योजनेत पुरस्कार मिळेल त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी गावाचा पुरस्कार गावात जावून द्यायचा हे धोरण निश्चित केले होते त्यामुळे नागापूर (प ) येथे येवून तत्कालीन पालकमंत्री रोहिदास पाटील यांनी पुरस्कार दिला होता असे आवर्जून यावेळी चितांगराव कदम यांनी सांगीतले.
यावेळी सविता कदम यांनी अध्यक्षीय मनोगता मध्ये सांगीतले की, आम्ही कदम दाम्पत्य दोघेही गावचे सरपंच राहिलो. गावाच्या हितासाठी सतत कार्य केल्यानेच आमच्या गावाचा कायापालट झाला असून हे सर्व आम्ही गावकऱ्यांच्या एकत्रीतपणे येवून काम करण्याच्या व दररोज १ तास गावासाठी या उपक्रमात गावकरी विशेषतः महिला वर्गाचा मोठा सहभाग लाभल्यामुळेच करू शकलो असल्याचे सांगीतले . यावेळी सत्काराला संतोष मुडे, साहेबराव धात्रक, सविता चंद्रे यांनी मनोगत व्यक्त करून उत्तर देवून आभार मानले .
यावेळी तालूक्यातील ३५ च्या जवळपास पत्रकारांचा भेट वस्तू व मकर संक्रांतीची भेट देवून गौरव करण्यात आला . संचलन डॉ . अंबादास कदम यांनी तर आभार छायाताई चापकोरे यांनी मानले . यावेळी पत्रकार दत्तात्रय देशमुख , स्वप्नील मगरे, प्रविण सुर्यवंशी , अरुण बेले, नंदनवार , राजेश गांजेगावकर, लक्ष्मीकांत नंदनवार, राजू गायकवाड, सुनिल ठाकरे , शैलेश ताजवे, अविनाश मुन्नरवार, हरिदास इगोलकर,संतोष कलाने, अजहरउल्ला खान, प्रशांत भागवत, संजय देशमुख, अशोक गांजेगावकर, हरिदास इंगोलकर , प्रदिप बाराहाते, बाबा खान, उत्तम राठोड,सुनिल ठाकरे, अर्चना भोपळे,सविता घुंगरे, राजू गायकवाड ( पोफाळी ) आदि उपस्थित होते .



