छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात संपन्न उमरखेड | प्रतिनिधी

youtube

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात संपन्न

उमरखेड | प्रतिनिधी

महसूल व वन विभागाच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ उमरखेड येथील राजस्थान भवन येथे उत्साहात पार पडले. शिबिराच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किसनराव वानखेडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार विजयराव खडसे, माजी आमदार नामदेवराव ससाणे, नगराध्यक्ष तेजस्वी जैन, उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे, ढाणकी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राणे, उमरखेडचे तहसीलदार सुरडकर, महागावचे तहसीलदार अनिल मस्के, गटविकास अधिकारी किरण कोळपे व शिक्षण अधिकारी विजय बेतेवाड तालुका कृषी अधिकारी अभय वडकुते,प्रकाश दुधेवार,अँड अदित्य माने अँड अनिल माने,कृष्णा पाटील देवसकर,सुदरशन रावते ,शिवाजी माने तसेच भाजपचे पदाधिकारी व विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी विविध शासकीय योजनांतील पात्र लाभार्थ्यांना प्रशस्तीपत्रे व शासकीय साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.

शिबिरामध्ये शेतकरी प्रमाणपत्र, गावठाण, जिवंत सातबारा अभियान, अतिक्रमण नियमितीकरण, मुख्यमंत्री बळीराजा शेतपांदण रस्ते योजना, महिलांसाठी विविध योजना, तसेच जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला आदी विविध शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला.

आमदार किसनराव वानखेडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “उमरखेड व महागाव तालुक्यातील कोणताही नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही. शासनाच्या सर्व योजना शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प आहे.”

यावेळी नितीन भूतडा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवत असून प्रत्येक पात्र नागरिकाने त्यांचा लाभ घ्यावा.

या अभियानादरम्यान रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. हजारो नागरिकांनी शिबिरात सहभाग नोंदवून विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे नियोजन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे केले.कार्यक्रम चे सूत्रसंचालन शंकर चव्हाण तर आभार महसूल प्रशासन कडुन मानले.

7 thoughts on “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात संपन्न उमरखेड | प्रतिनिधी”

  1. Helloo ssuperb blog! Doess runhing a blo similar tto thi requiree
    a greeat eal of work? I’ve nno expertose iin codiing however I waas hoping too star mmy owwn blkog iin the nearr
    future. Anyway, should yoou hav any ideas orr techniqes forr nnew bloig owners plese share.
    I underztand this iss ooff sibject neverrtheless I jjust had to ask.

    Cheers! xnxx

  2. M88cvf is my go-to spot lately! Seriously, the variety of games keeps things interesting, and the odds are pretty sweet. Def worth checking out! Get in on the action here: m88cvf

  3. I was skeptical at first but this platform is legit. The customer service is very helpful and the withdrawal process is quick. Give krmmwin a try if you want a reliable site.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!