प्रहार जनशक्ती चे आज भीक मागो ठिय्या आंदोलन
प्रहार जनशक्ती पक्षाचे भिक मांगो व ठिय्या आंदोलन
[ दिव्यांगानी अंगावरती पट्रोल टाकुन केला आत्महत्याचा प्रयत्न ]
उमरखेड शहर प्रतिनिधी :
आज जागतिक दिव्यांग दिन या दिव्यांग दिनानिमित्त प्रहार जनशक्ती पक्ष उमरखेड तालुका च्या वतीने नगरपरिषद येथे दिव्यांग बांधवांच्या हक्काचा असलेला ३ टक्के व ५टक्के निधी हा त्यांच्या खात्यात जमा करावा यासाठी “भीक मांगो आंदोलन ” करण्यात आले नगर परिषद उमरखेड येथे हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये दिव्यांगांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळत नसल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सय्यद माजिद आणि दिव्यांग बांधव बजरंग पवार यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला . तसेच
कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड येथुन दिव्यांग बांधवानी भिक मांगो अंदोलन करून रॅली काढण्यात आली .
नगर परीषद उमरखेड दि .12/10/2021 रोजी झालेल्या न.प. सर्वसाधारण सभेत ठराव क्र .12 मध्ये घेण्यात आलेल्या दिव्यांग बांधवावर अन्याय करणारा व त्यांच्या हक्कापासून वंचीत ठेवणारा ठराव वापस घेऊन . दिव्यांगाना मिळणारा हक्काचा 3 % व 5 % निधी हा दिव्यांग बांधवाच्या खात्यात जमा करा .या मागणी साठी आज प्रहाज जनशक्ती पक्षाचे न.प विरोधात भीक मांगो व ठिय्या आंदोलन करण्यात आले .
समाजात वावरणारा एक घटक म्हणजे ज्यांना कोणाचीही साथ नाही.नियतीने त्यांच्यावर अगोदरच अन्याय केलेला आहे.शरीरावर कोणते ना कोणते अवयव हे निकामी झाली असल्यामुळे त्यांच्याकडून कोणतेही कामे होत नाही . आपल्या कार्यालया कडून शासना कडून मिळत असलेल्या 3% व 5% अनुदानावर आपले उदरनिर्वाह चालवित असतात पण दिव्यांग निधी हा आपल्या कार्यालय कडून गेल्या 4 वर्षापासून इतर गोष्टीवर खर्च केल्या केल्या जात आहे .
त्यामुळे दिव्यांग बांधव आर्थिक अडचणीत सापडले असून .त्यांना आपल्या कार्यालया कडून मिळणारा त्यांच्या हक्काचे अनुदानरुपी आधाराची गरज असताना सुद्धा .आपण दि. 12 /10 /2021रोजी झालेल्या नगर परिषद सर्वसाधारण सभेत ठराव क्रं .12 .मध्ये दिव्यांग बांधवांच्या निधीतून पूर्वीपासून चालू असलेला ई -रिक्षा प्रवासाची सेवा चालू ठेवण्यात यावी असा दिव्यांग बांधवांवर अन्याय करणारा त्यांना त्यांच्या न्याय् हक्कांपासून वंचित ठेवणारा ठराव पारित केला गेला .
भीक मांगो आंदोलन व ठिया आंदोलनासाठी जास्तीत जास्त दिव्यांग बांधव उपस्थित होते हा आव्हान प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. या आंदोलना प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष रोहित मोहीतवार . अंकुष पानपट्टे व इतर कार्यकर्त्यांनी दिव्यांगांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले .
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me. https://accounts.binance.com/pt-BR/register-person?ref=P9L9FQKY