ट्रकचालकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

youtube

ट्रक चालकाचा दगडाने ठेचून हत्या

उमरखेड .

उमरखेड तालुक्यातील चिल्ली सुकळी(ज)गावाजवळ तुळजापूर नागपूर महामार्गावर रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळला .आज सकाळी सहा वाजता सुकळी येथील शेतकरी मधुकर गंगात्रे यांच्या शेताच्या धुर्‍यावर एक मृत्यू देह दिसल्याचे खळबळजनक वृत्त पोलिसांना कळविण्यात आले माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल होऊन मृतकाचे पंचनामा करून मृतकाचे नाव अमर कुमार रा . औरंगाबाद बिहार राज्य वय २५ वर्ष येथील मृतक असल्याचे हायवेवरुन जात असलेले दुसरे ट्रक चालक वेदराम ठाकूर रा .भिलाई छत्तीसगड यांनी पोलिसांना सदर मृतकाचे ओळख असल्याचे सांगितले .
आणि मृतका सोबत रात्री आठ वाजता फोनवर संभाषण झाल्याचे सुद्धा वेदराम ठाकूर यांच्याकडून सांगण्यात आले . मृतक अमरजीत कुमार ट्रक चालक हे ट्रक घेऊन बिलासपुर छत्तीसगढ ते परळी ट्रक क्रमांक CG 07 A X 3772 दगडी कोळसा घेऊन जात होता सदर घटना रात्री 1ते 4 च्या दरम्यान घडली असे अंदाज वर्तवण्यात येत आहे .
परिस्थितीजन्य पुराव्यावरून मृतकाचे हत्या झाल्याचे वर्तवण्यात येत आहे .तपास करण्यासाठी यवतमाळ येथून फॉरेन्सिक लॅब तज्ञ व डॉग स्कॉट बोलावण्यात आलेले आहे .हत्या चे कारण अद्यापही उघडकीस आलेले नाही व मारेकरी अजूनही कोण आहेत हे पुढे आलेले नाही .पुढील तपास उपविभागीय अधिकारी मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेड पोलिस निरीक्षक अमोल माळवे, पीएसआय विनीत घाटोळ, ए . पी .आय .संदीप गाडे यांची टीम करत आहे .मृतक शरीर शवविच्छेदनासाठी उमरखेड शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे .

 

Google Ad
Google Ad

6 thoughts on “ट्रकचालकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

  1. Your article gave me a lot of inspiration, I hope you can explain your point of view in more detail, because I have some doubts, thank you. 20bet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!