पुसद तालुक्यातील शेंबाळपिपरी गावात फलक काढण्याच्या वादातून दोन गटात तुफान दगडफेक.

पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी गावात फलक काढण्याच्या वादातून दोन गटात तुफान दगडफेक
पोलिसांचे वाहनावर दगडफेक
वाहनाच्या काचा फोडल्या!
पुसद शेंबाळ पिंपरी
पुसद – पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी गावात फलक काढण्याच्या वादातून दोन गटात तुफान दगडफेक झाली. यामध्ये सरपंच सहित आठ ते दहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलीस पथक आणि तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच, दंगल नियंत्रक पथकही घटनास्थळी पोहचले आहे.शेंबाळपिंपरी गावात दोन गटात तणाव शेंबाळपिंपरी गावात फलक काढण्याच्या वादातून दोन गटांत तणाव निर्माण झाला. त्याचे रुपांतर नंतर दगडफेकीत झाले. या दगडफेकीत सरपंचासोबत आठ ते दहा नागरिक जखमी झाले आहे
खंडाळा पोलीस स्टेशन माहिती मिळतात खंडाळा पोलीस स्टेशनची पोलीस कर्मचारी शेंबाळपिंपरी येथे दाखल होताच पोलिसाच्या वाहनावर सुद्धा दगडफेक करण्यात आली असून यामध्ये पोलिसांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत गावातील गडफेक बंद आहे. या घटनेमुळे शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद झाली असून, मात्र तणावपूर्ण वातावरण आहे.
पुसद, उमरखेड, यवतमाळ येथून शेंबाळपिंपरीत एसआरपीएफची एक तुकडी पाठवण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, स्थनिक गुन्हे शाखा गावात दाखल झाले आहे.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.