दोन तरुण जागीच ठार शिळोणा घाटातील घटना.
![](https://narishaktinews.com/wp-content/uploads/2022/07/IMG-20220702-WA0187.jpg)
दोन तरुण ठार जागीच ठार शिळोणा घाटातील घटना
नमो महाराष्ट्र
उमरखेड
पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिळोना घाटात दुचाकी आणि आयचर या वाहनाच्या झालेल्या अपघातामध्ये दोन तरुण ठार झाल्याची घटना दिनांक २ जुलै 22 रोजी दुपारी बाराच्या दरम्यान घडली.
सविस्तर वृत्त असे की सुमेध सुरेश राठोड वय २० वर्ष रा. वानोळा पाचोळा ता. माहुर आणि निलेश शाम आडे वय २१ वर्ष रा. मेट ता. उमरखेड हे दोघे उमरखेड वरुन शिळोनाकडे दुचाकी क्रमांक एम. एच. २९ बि.आर. ४७०९ वरुन जात असताना शिळोना घाटात पुसद कडुन भरधाव वेगाने येनाऱ्या ( चाकोते कंपनीचे) क्रमांक एम. एच.२४ ए. बि. ८९९१ मालवाहू आयचरला धडक लागून भिषण अपघात झाला.
या अपघातात सुमेध हा जागीच ठार झाला, तर निलेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघेही तरुण आपल्या भाचीच्या वाढदिवसाला जाताना ही घटना घडली.अपघाताची माहिती मिळताच पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजीव हाके,बिट जमादार किसन राठोड, रावसाहेब शेंडे, शिवाजी भरोशे, पत्रकार सुनील ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.घडलेल्या घटनेचा तपास पोफाळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार राजीव हाके करीत आहेत.