उमरखेडच्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर अध्यक्ष संजय बजाज तर उपाध्यक्ष साहेबराव शाहू जाधव यांची सर्वांमते निवड

youtube

उमरखेडच्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर अध्यक्ष संजय बजाज तर उपाध्यक्ष साहेबराव शाहू जाधव यांची सर्वांमते निवड

उमरखेड:
येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी वर मागील चाळीस वर्षापासून लगातार काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत यावेळीही अविरोध बहुमत स्थापित झाल्यानंतर अध्यक्ष पदी संजय बजाज यांची सर्वानुमते निवड करण्यात आली

यावेळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी कार्यालय येथे नवनियुक्त संचालकांचा निवड सभा आयोजित करण्यात आली होती
या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पिंपरखेडे यांच्या उपस्थिततित अध्यक्ष पदासाठी संजय बजाज यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी साहेबराव शाहू जाधव यांचा अर्ज अश्या दोनही अर्जाची प्रक्रिया पूर्ण करून दोघांची निवड जाहीर करण्यात आली
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल,सुधाकर लाहेवार,बाबुराव चौधरी,गोपाल अग्रवाल,अजय माहेश्वरी तसेच संचालक मंडळातील अवधूत शिंदे, सुरेश कवाने, रामराव नरवाडे, प्रभाकर गांजरे, कयूमखा पठाण, गोदावरी गायकवाड, विश्वंभर पवार, पांडुरंग इटकरे, आनंदराव चिकणे, माधवराव सुकळकर आणि शशिकला दिघेवार नवनियुक्त संचालक मंडळ उपस्थित होते यावेळी निवड झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षांनी आपली निवडीचे श्रेय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्रत्वाला व सर्व शेतकरी बांधवाना दिले आहे

Google Ad
Google Ad

1 thought on “उमरखेडच्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर अध्यक्ष संजय बजाज तर उपाध्यक्ष साहेबराव शाहू जाधव यांची सर्वांमते निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!