शिंदगी विविध कार्यकारी सोसायटी च्या अध्यक्षपदी तानाजीराव पतंगे पाटील व उपाध्यक्षपदी अनिल मस्के यांची बिनविरोध निवड
शिंदगी विविध कार्यकारी सोसायटी च्या अध्यक्षपदी तानाजीराव पतंगे पाटील व उपाध्यक्षपदी अनिल मस्के यांची बिनविरोध निवड
उमरखेड – तालुक्यातील शिंदगी येथील बळीराजा शेतकरी विकास पँनल सोसायटीच्या निवड करण्यात आल्या . त्या निवड मध्ये शिंदगी माणकेश्वर, सोईट, महागाव (ढाणकी) या विविध कार्यकारी सोसायटी च्या अध्यक्षपदी सर्वांच्या मते तानाजीराव पतंगे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या सोसायटी मध्ये चार गावाची प्रथा या गेल्या पन्नास वर्षापासून आजपर्यंत बिनविरोध परंपरा कायम ठेवत शिंदगी वासियांनी मानाचा मोठे पणा करत मानकेश्वर ला अध्यक्ष पद बहाल केले आहे. तर उपाध्यक्षपदी अनिल मस्के यांची निवड करण्यात आली आहेत. बळवंतराव नाईक माजी सरपंच, दत्तराव पतंगे माजी सरपंच पांडुरंग पतंगे, अशोकराव पतंगे, तसेच सोसायटीचे माजी अध्यक्ष पप्पू पाटील सुरोशे ,साहेबराव सुरोशे ,संजीव सुरोशे, बापूराव माने ,नामदेवराव पतंगे ,विश्वास पतंगे ,विठ्ठलराव पतंगे, चादंराव तास्के उपसरपंच या सर्वांनी पुढाकार घेतला. तसेच सौ चंद्रकलाबाई पतंगे, सौ.चित्रा नामदेवराव पतंगे ,जनार्दन विठ्ठलराव पतंगे, शिंदगी येथील परमेश्वर सुरोशे, बंडू सुरोशे, सौ. विमलबाई पाटील, माने, विठ्ठल जांभळे ,देविदास संभा माघाडे, शिवप्रसाद वंजारे, भगवान कवडे, उपस्थित होते तसेच माणकेश्वर चे माजी सरपंच बाळू पतंगे, उपसरपंच जगदेवराव पाटील, सरपंच संभा गायकवाड,मा.जी अध्यक्ष बापुराव पाटील होते. तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष तानाजीराव पतंगे व अनिल मस्के यांनी संचालक मंडळाचे आणि ज्येष्ठ नेत्यांचे व गावकरी मंडळ यांचे आभार मानले.