गेल्या दोन दिवसापासून यवतमाळ, हिंगोली ,नांदेड,जिल्ह्यात वरुणराजाने पुनरागमन केलंय.

youtube

 

गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळ, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात वरूणराजाने पुनरागमन केलय.
उमरखेड…
पैनगंगा नदीवरचा सहस्त्रकुंड इथला धबधबा पुन्हा विशाल आकारात प्रवाहित झालाय. मध्यंतरी पाऊस वीस दिवस गायब होता, त्यामुळे धबधब्याचा प्रवाह काहीसा कमी झाला होता. आता बरसलेल्या दमदार पावसाने सहस्त्रकुंड धबधब्याचे नयनरम्य दृश्य पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. त्यामुळे सहस्त्रकुंड इथल्या धबधब्यावर आज सकाळपासूनच पर्यटकांची गर्दी दिसून आलीय. शेकडो फुटावरून बरसणाऱ्या जलधारा समोर सेल्फी घेण्याचा मोह तरुणाईला आवरत नसल्याचे दिसतंय. विशेषतः शेजारच्या तेलंगणा राज्यातून सहस्त्रकुंड इथे पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसतेय, त्यातून इथल्या व्यापार आणि हॉटेल्सना चांगले दिवस आलेयत.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!