वसंत सुरू होण्याचा मार्ग अखेर मोकळा कारखाना भाडेतत्त्वावर जाण्यासाठी माननीय साखर आयुक्त पुणे यांच्याकडून निविदा सूचना जाहीर.
वसंत सुरू होण्याचा मार्ग अखेर मोकळा
कारखाना भाडेतत्त्वावर जाण्यासाठी माननीय साखर आयुक्त पुणे यांच्याकडून निविदा सूचना जाहीर!
उमरखेड प्रतिनिधी
कामगार, ऊस उत्पादक व राजकीय नेते मंडळी तथा संबंधित अधिकाऱ्याच्या प्रयत्नाला अखेर यश येऊन वसंत सहकारी साखर कारखाना सुरू होण्याचा मार्ग 100% मोकळा झाला आहे वसंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी माननीय साखर आयुक्त पुणे यांनी निवेदन प्रक्रिया
टेंडर प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्वात जास्त भाडे देणाराला साखर कारखाना भाड्याने देण्यात येईल त्यानंतर कारखाना भाड्याने घेणारा कारखानदार मशिनरीची दुरुस्ती नवीन ऑटोमॅटिक युनिट नुसार तीन महिन्यांमध्ये करण्याची शक्यता आहे एकूणच जानेवारी 2023पासून साखर कारखाना सुरू होईल अशा सर्व मान्यवरांनी अशा व्यक्त केल्या आहेत ऊस उत्पादक कामगार, तोडणी वाहतूकदार व्यापारी व साखर कारखान्यावर अवलंबून असलेले सर्व घटक साखर कारखाना सुरू होत असल्यामुळे नक्कीच आनंदित होतील राजकारण्यांच्या स्वार्थी प्रवृत्तीने गैर कारभार तथा अनियमिततेने बंद पडलेला साखर कारखाना पाच वर्षांनी सुरू होणार असून कारखान्याचा धूर पुन्हा एकदा परिसरातील लोकांना दिसेल काही
स्वार्थी व गैर कारभारी राजकारण्यांनी हा साखर कारखाना ऊस उत्पादक कामगारांची काम धेनु कायमची बंद पाडली होती परंतु कामगार ऊस उत्पादक व काही राजकारण्यांनी तथा संबंधित अधिकाऱ्यांनी जनहितासाठी समोर येऊन बंद पाडलेली ही वास्तू पुन्हा नव्या जोमाने सुरू होण्याचे अतिशय चांगले काम केले आहे ऊस उत्पादक सभासद कामगार शेतमजूर तोडणी वाहतूकदार व्यापारी व कारखान्यावर अवलंबून असलेले सर्व घटक त्यांचे अभिनंदन करीत आहेत