पर्यावरण पूरक साहित्यांनी दिपावली साजरी करा.

पर्यावरण पूरक साहित्यांनी दिपावली साजरी करा
उमरखेड..
पार्वती ग्रुप उमरखेड व शितल सखी मंच च्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना दिपावलीसाठी आकाश कंदील बनविण्याचे एकदिवसीय प्रशिक्षण धनश्री लोखंडे (तज्ञ हॅन्डीक्राफ्ट आर्ट, ड्रेस डिझायनिंग दिग्रस) यांच्या मार्फत देण्यात आले. पर्यावरण पूरक श्री गणपती मखर या शीतल सखी मंच च्या उपक्रमाला उमरखेड नगरीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला असून त्याच धर्तीवर पर्यावरण पूरक दिपावली साजरी करण्याचा आमचा संकल्प आहे असे मत पार्वती ग्रुप च्या अध्यक्ष रूपाली शिरडकर यांनी व्यक्त केले,सोबतच डेकोरेटीव्ह मीरर ,एक्झाम पॅड , वन पीस फंगशनल ड्रेस ईत्यादी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. याकरिता लागणारे साहित्य देखील शितल सखी मंच च्या माध्यमातून ठोक दराने उपलब्ध होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तेजश्री पापड उद्योग च्या संचालक शारदा ताई धात्रक तर प्रमुख पाहुणे म्हणून कुसुम शिरडकर, कोमल बेंडके, शिल्पा वानखेडे, सविता स्वामी, विद्या सुर्यवंशी ,कल्पना चटणे व इतर महिला उपस्थित होत्या.
शितल सखी मंच हे महिलांनी महिला साठी बनविलेले व्यासपीठ आहे आणि ते शितल लढ्ढा रिसर्च सोसायटी आणि पार्वती ग्रुप उमरखेड यांचा संयुक्त उपक्रम आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साक्षी शिरडकर, अनुज लोखंडे यांनी परिश्रम घेतले.
Your article gave me a lot of inspiration, I hope you can explain your point of view in more detail, because I have some doubts, thank you.