विविध उपक्रम राबवित ठिकाणी वटपौर्णिमा साजरी.

youtube

विविध उपक्रम राबवित ठिक ठिकाणी वटपोर्णीमा साजरी

बरडशेवाळा ता.२४ ( बातमीदार ) हदगाव तालुक्यासह बरडशेवाळा बामणी फाटा पळसा मनाठा चिंचगव्हान पिंपरखेड नेवरी नेवरवाडी उंचाडा करमोडी पिंपरखेड कवाना पिंगळी केदारनाथ सह परीसरात वटपोर्णीमा महिलांनी वडाच्या झाडाचे पुजन करीत पती राजाला सुखी ठेवण्यासाठी प्रार्थना केली.तर जगावर आलेल्या कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी व पावसाने उघडीप दिले असल्याने देवाला प्रार्थना करीत साकडे घालत सर्वांना सुखी ठेवण्यासाठी ईश्वराला प्रार्थना करीत विविध उपक्रम राबवित वटपोर्णीमा साजरी केली.
तर बरडशेवाळा अंगणवाडी केंद्र एक च्या प्रांगणात जिवनांकुर सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून वटपोर्णीमा निमित्त गल्लीतील महिलांच्या हस्ते वड या पर्यावरण उपयोगी वृक्ष लागवड करुन पुजा करीत लावलेल्या वृक्षाच्या त्यांच्या संगोपनाची जबाबदारी महिलांनी घेतली . यावेळी नंदाताई गिरी, ग्रामपंचायत सदस्या लता दहीभाते, सुनीता दहीभाते, यांच्या सह वार्ड क्रं एक मधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!