रस्ता व नवीन इमारत बांधकाम साठी निधी उपलब्ध करून दयावा खा.हेमत पाटील यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी.
रस्ता व नवीन इमारत बांधकाम साठी निधी उपलब्ध करून दयावा खा. हेमंत पाटील यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी.
बरडशेवाळा ता.१३
हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील व राजश्री ताई पाटील माहुर दौऱ्यात वांरगा मार्ग जात असताना बरडशेवाळा येथे दत्तात्रय अंनतवार यांच्या निवासस्थानी भेट दिली असता खासदार हेमंत पाटील व राजश्री ताई पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्यांनंतर त्यांनी उपस्थितांकडुन परीसरातील अडीअडचणी जाणून घेतल्या.बरडशेवाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा धनगर समाज युवा मल्हार सेनेचे तालुका अध्यक्ष प्रभाकर दहीभाते यांनी बरडशेवाळा गावात ये-जा करण्यासाठी एकच अरुंद असल्याने दुसऱ्या बाजूला असलेल्या कच्चा रस्ता पक्का करून देण्याची मागणी केली.तर मोडकळीस आलेल्या ग्रामपंचायतीसह शाळेच्या इमारतीची व्यथा सांगत शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून नवीन इमारत देण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली.तर करोडो रुपये खर्च करून होत असलेल्या महामार्गाच्या कामाचा बोगस कामाचा पाडा वाचवला.तर बरडशेवाळा येथील बायपास वर कंपनी च्या आडमुठ्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचे शेतकरी ज्ञानेश्वर यमकुरे यांनी सांगितले.सामाजिक कार्यकर्ते गजानन अंनतवार यांनी कवाना येथे व्यायाम शाळेला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.खासदार हेमंत पाटील उपस्थित कार्यकर्त्यांना पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी प्रभाकर दहीभाते, गजानन अंनतवार, ज्ञानेश्वर यमकुरे विशाल शिरफुले ,प्रदिप नरारे ,सतीश चेपुरवार,सोनबाराव मस्के, रामराव पाकलवार,दत्ता सुरोशे, सुर्यवंशी,आलेवार, राठोड यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.