साताऱ्याच्या महिलेचा नांदेड जिल्हा मध्ये अपघात मोटरसायकलवर साडेतीन शक्तिपीठांची दर्शन अर्धवट

youtube

साताऱ्याच्या महिलेचा नांदेड जिल्हा त अपघात मोटर सायकल व साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन अर्धवट.
अर्धापुर..

सातारच्या हिरकणी बाईक राईड करत साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी मोहिमेतील हिरकणी बाईक रायडर्सच्या गृप मधिल शुभांगी संभाजी पवार वय ३२ वर्षे यांचे अर्धापूर तालुक्यातील दाभड हद्दीत भोकरफाटा येथे अपघात झाला.या अपघातात टँकर डोक्यावरून गेल्याने अपघात ठिकाणीच मृत्यू झाला.

सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या नऊ महिला सदस्या दि.१० ऑक्टोबर रोजी १ हजार ८६८ किमी प्रवासासाठी मोटार सायकल ने नवरात्रोत्सवात आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपिठांचे दर्शन घेण्यासाठी साताऱ्यातील हिरकणी बाईक रायडर्स निघाल्या होत्या.
त्यांनी कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन ते तुळजापूर पोहचल्या त्यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन करून पुढील माहूर गडाची रेणुकामाता दर्शनासाठी जात असतांना भोकर फाटा दाभड येथे टँकर चालकाने जोरदार धडक दिल्याने शुभांगी पवार यांच्या जागांवर मृत्यू झाला आहे.
त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी अर्धापूर जि. नांदेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल केले आहे.
अपघातातील मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षक अशोक जाधव,पोलीस उपनिरीक्षक कपील अगलावे,पोलीस कर्मचारी महेंद्र डांगे,महामार्गचे रमाकांत शिंदे,गजानन डवरे,वसंत सिनगारे मृत्यूजय दूत गोविंद टेकाळे यांनी मदत केली आहे टँकर जि. जे. १२ ए.टी.६९५७ हा टँकर अर्धापूर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे

Google Ad
Google Ad

1 thought on “साताऱ्याच्या महिलेचा नांदेड जिल्हा मध्ये अपघात मोटरसायकलवर साडेतीन शक्तिपीठांची दर्शन अर्धवट

  1. Your article gave me a lot of inspiration, I hope you can explain your point of view in more detail, because I have some doubts, thank you.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!