वाढत्या गॅस सिलेंडर मुळे पुन्हा पेटत्या चुली निघाला धूर.

youtube

वाढत्या गॅस सिलेंडर मुळे पुन्हा पेटल्या चुली अन निघाला धूर.

गॅस सिलिंडरवर मिळणारी सबसिडी गेली कुठे…?

 

मुळावा

 

-:
केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत ग्रामीण भागात उज्वला गॅस योजने अंतर्गत घरोघरी गॅस सिलेंडरचे वाटप केले होते.
त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा चुलीवर स्वयंपाक करण बंद झालं होत. पण गेल्या काही वर्षांपासून गॅस सिलेंडर च्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.महिन्याला आठसे ते नऊसे रुपये मोजून गॅस खरेदी करणे गरिबांना परवडणारे नाही. परिणामी गॅस बाजूला ठेऊन पुन्हा ग्रामीण भागातील महिला चुलीवर स्वयंपाक करण्यास पसंती देत आहेत.एकीकडे सिलेंडर च्या किमती वाढत जात आहेत तर
केंद्र सरकारने त्यावर दिल्या जाणाऱ्या सबसिडी बाबत सुद्धा सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण केली आहे. पेट्रोलियम कंपन्याही सबसिडी सुरु असल्याचा दावा करीत आहेत.तर प्रत्यक्ष्यात ग्राहकांच्या बँक खात्यात पैसे जमा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.केंद्र सरकारने पहल योजने अंतर्गत 1 जानेवारी 2015 पासून गॅस सिलिंडरची सबसिडी थेट ग्राहकांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यास सुरु केली होती सुरुवातीच्या काळात ग्राहकांना या योजनेचा (डिबीटीएल)फायदा मिळाला.मात्र मागील काही काळात सिलिंडर चे दर भरपूर प्रमाणात वाढू लागले. आणि सबसिडी कमी होत गेली. काही ग्राहकांनी तर चक्क तीन ते चार महिन्यापासून सिलिंडर घेतल्यानंतरही सबसिडी जमा झाली नसल्याचे म्हटले आहे. या गोंधळाबाबात प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.पहल योजने अंतर्गत अजूनही सबसिडी दिली जात नाही. ती पूर्णता बंदही झालेली नाही.मात्र सुरुवातीच्या तुलनेत ग्राहकाच्या खात्यात जमा होणारी रक्कम कमी झालेली आहे. हे वास्तव सत्य आहे.तरी ही कमी झालेली सबसिडी वाढून वेळोवेळी ग्राहकांच्या खात्यात जमा करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.वाढत्या गॅस च्या किमंती आणि बंद झालेली सबसिडी यामुळे पुन्हा पेटल्या चुली अन निघाला धूर अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

Google Ad
Google Ad

1 thought on “वाढत्या गॅस सिलेंडर मुळे पुन्हा पेटत्या चुली निघाला धूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!