सामजिक उपक्रम राबविणे काळची गरज – कोहळीकर
सामाजिक उपक्रम राबविणे काळची गरज
कोहळीकर
कवाना येथे दुर्गा महोत्सवात रक्तदान, नेत्रदान, लसीकरण शिबिर संपन्न
बरडशेवाळा …..
श्री संत नंदी महाराज यांच्या पावन भूमीत मौजे कवाना ता.हदगांव येथील युवकांनी श्री क्षेत्र तुळजापूर येथुन मोठ्या भक्तिभावाने पायी चालत गावात मशाल आणत गावकऱ्यांनी दुर्गा देवीची स्थापना केली. इतर खर्च न करता आजच्या परिस्थितीचा विचार करून पहिल्या दिवशी घेतलेल्या रक्तदान शिबिरात चोवीस युवकांनी रक्तदान केले.तर दुसऱ्या दिवशी गावात आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोवीड लसीकरण शिबिर यशस्वी झाले.तर आज सोमवार अकरा रोजी नेत्रदान शिबिराचे उदघाटन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्यांनी दुर्गा महोत्सव समिती गावकऱ्यांनी राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक व्यक्त करीत मार्गदर्शन केले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे युवा तालुकाध्यक्ष निळु पाटील, संभाजीराव लांडगे, सरपंच, पोलिस पाटील रंगराव प्रधान, तंटामुक्त समिती अध्यक्ष नामदेवराव सुरोशे, सावित्रीबाई फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक कदम, शिक्षक सादुलवार, औटे, सोनटक्के , ज्ञानेश्वर यमकुरे विशाल शिरफुले बरडशेवाळा, गजानन मस्के, ज्ञानेश्वर हाराळे, मस्के, पळसेकर, प्रदिप नरारे, सतीश चेपुरवार, शुभम चौरे, कृष्णा तोडकर, वैभव बोमले, आयोजक गजानन अंनतवार, दुर्गा महोत्सव समिती व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.