वसंतराव नाईक कृषि विद्यालयाच्या शिक्षकांना लगाम कोणी लावायचा.
वसंतराव नाईक कृषि विद्यालयाच्या शिक्षकांना लगाम कोणी लावायचा
ढाणकी/प्रतिनिधी :
ग्रामीण भागात असलेले वसंतराव नाईक कृषी विद्यालय या शाळेमध्ये मनमानी कारभार सुरू आहे. या शाळेत शिकवणारे शिक्षक, लिपिक, मदतनीस, जेमतेम ९० टक्के कर्मचारी तालुक्यावरून, जिल्ह्यावरून जाणे येणे करत आहेत. त्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत. कारण इतक्या दूरवरून प्रवास केल्यामुळे शिक्षक स्वतःच परेशान होऊन येतात, ते विद्यार्थ्यांना काय शिकवणार,? तासिका प्रेड करत असताना घरून पत्नीचा फोन येतो पोहोचले का सुखरूप ? मग विद्यार्थ्यांना वाचन करायला सांगून अर्धा अर्धा तास फोनवर बोलत रहाने, दुपारची सुट्टी होण्यापूर्वी ४ते ५ शिक्षक बस स्थानकावर जाऊन चहा कॉफी घेऊन फालतू टाईमपास करणे, असे नित्य नियमाप्रमाणे रोजचे काम ठरले आहे. यांच्या या कामचुकार व हलगर्जीमुळे विद्यार्थ्यांवर फार मोठा परिणाम पडताना दिसत आहे. कारण कोणत्याही आई-वडिलांना वाटते की माझा मुलगा / मुलगी शिकली पाहिजे पदवीधर झाली पाहिजे. किंवा उद्योगी, व्यवसायिक झाले पाहिजे. म्हणून वाटेल ते काबाडकष्ट करून आपल्या मुला-मुलींना शाळा शिकवीत असतात. पण शाळेमध्ये अशा वातावरणात विद्यार्थ्यांमध्ये बदल दिसत नसल्यामुळे बंदी भागातील काही पालकांनी वसंतराव नाईक कृषी विद्यालय कडे धाव घेतली. व मुख्याध्यापिका मुनेश्वर मॅडम यांच्याकडे लेखी तक्रार दिली. त्या अर्जाद्वारे कळविण्यात आले की, आमच्या पाल्याच्या शिक्षणामध्ये फारसा बदल दिसत नसल्यामुळे, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची कमतरता जाणवत आहे. तरी संस्थापक अध्यक्षांना ही बाब कळविण्यात यावी. ही लेखी तक्रार दि. २८ नोव्हेंबर २०२२ रोज सोमवार रोजी केली होती. शिक्षकांचा व पदवीधरांचा मनमानी कारभार व मुख्यालयी राहिले नाही तर, येत्या २३ डिसेंबर २०२२ रोजी काही पालकासह अमरण उपोषण करण्यात येईल असे स्पष्ट लिहिलेले आहे. तरीही वसंतराव नाईक कृषि विद्यालय च्या कोणत्याही शिक्षकांमध्ये बदलाव झालेला दिसत नसल्यामुळे, काही पालकांना आमरण उपोषण करावे लागेल. तेव्हाच ग्रामीण भागातील जनतेला व पालकांना न्याय मिळेल अशी चर्चा बंदी भागातील पालकांमध्ये ऐकण्यास मिळत आहे.
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me. https://www.binance.info/ru/join?ref=FIHEGIZ8