यमुना ज्ञान – विज्ञान संस्कृतिपीठ आयोजित कर्तव्यनिष्ठ पुरस्कार जाहीर चौकट : पुरस्काराचे वितरण २८ फेब्रुवारीला
यमुना ज्ञान – विज्ञान संस्कृतिपीठ आयोजित कर्तव्यनिष्ठ पुरस्कार जाहीर
चौकट :
पुरस्काराचे वितरण २८ फेब्रुवारीला
प्रतिनिधी
उमरखेड : यमुना ज्ञान विज्ञान संस्कृतीपीठ मार्फत दिला जाणारा कर्तव्यनिष्ठ पुरस्कार २०२४ आणि गुणवंताचा अभिनंदन सोहळा २८ फेब्रुवारी रोजी यमुना ज्ञान विज्ञान संस्कृती पीठ यमुना नगर, उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे सकाळी ११ वाजून ४५ मिनिटाला वितरित होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भास्करराव पंडागळे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र नजरधने माजी आमदार उमरखेड महागाव विधानसभा ,कलावतीबाई जगदेवराव राणे दिघडी, डॉ . प्र.भा .काळे संत साहित्याचे अभ्यासक, अँड संतोष जैन ज्येष्ठ विधीतज्ञ उमरखेड, विलासराव देवसरकर, प्रा. डॉ .एस .आर . वज्राबादे सेवानिवृत्त उपप्राचार्य यांच्या उपस्थितीमध्ये गोविंदराव सखाराम दवणे सेवानिवृत्त उपाधीक्षक भूमि अभिलेख, सुधाकरराव देवराव वानखेडे सह शिक्षक तेजमल गांधी कृषी विद्यालय ब्राह्मणगाव, विजय खेमा राठोड तरुण उद्योजक घामापुर यांना कर्तव्यनिष्ठ पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे तर डॉ . पल्लवी रवींद्र कोकाटे (राऊत )उमरखेड डॉ . कृष्णराव भेगाजी पाचकोरे सहशिक्षक जिल्हा परिषद शाळा बारा, साईनाथ मारोतराव चंदापुरे सहशिक्षक गुरुदेव गोरोबा विद्यालय उमरखेड ,कु .शाहू दशरथ केंद्रे मुख्याध्यापिका प्राथमिक मराठी शाळा मुळावा यांना यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे तरी आपण या सामाजिक व सांस्कृतिक सोहळ्यास व स्नेह भोजनास उपस्थित राहण्याचे आवाहन यमुना ज्ञान विज्ञान संस्कृती पीठ यमुना नगर चे संचालक प्राचार्य डॉ .वि .ना . कदम व रंजना कदम यांनी प्रसिद्धी पत्रका व्दारे केले आहे
This site is incredible. The radiant material shows the administrator’s enthusiasm. I’m dumbfounded and envision more such astonishing substance.