महीलेच्या नावाने सोशल मिडीयाच्या माध्यमातून हँनी ट्रँप पुरूष आरोपी पोलिसांच्या जाळ्यात.
महीलेच्या नावाने सोशल मीडीयाच्या माध्यमातुन ( हनी ट्रॅप ) – श्रीमंतांना जाळयात अडकविणारा पुरुष आरोपी यवतमाळ पोलीसांचे जाळयात
यवतमाळ….
सोशल मीडियाच्या माध्यमातुन ओळख निर्माण करुन चक्क ०२ कोटी रुपयाची फसवणुन झाल्याची तक्रार प्राप्त होताच अवघ्या २४ तासाच्या आत गुन्याहयाचा उलगडा करुन गुन्हयातील आरोपी निष्पण्ण करुन फसवनुकीची हस्तगत करण्यात यवतमाळ पोलीसांना यश आले . सोशल मिडीयाच्या माध्यमातुन यवतमाळ येथील एका तरुनीने दिल्ली येथिल नामांकित डॉक्टरसोबत मैत्री पुर्ण संबंध प्रस्तापित करुन त्यांचे कडून दोन कोटी रोख रक्कम , मौल्यवान दागीण्यांची भेट स्विकारली व त्यांनतर स्वताचे अकाउंट अचानक बंद केल्याने स्वताःची फसवणुक झाल्यचे लक्षात आल्याने त्याने थेट यवतमाळ गाठत पोलीस अधिक्षक कार्यालय यवतमाळ येथे समक्ष येउन आपली आपबीती सांगितली . सदर तक्रारीचे गांभिर्य लक्षात घेउन पोलीस अधिक्षक यवतमाळ यांनी त्वरीत उपविभागिय पोलीस अधिकारी , यवतमाळ व सायबर सेल यांना घटणेची शहानिशा करुन आरोपी निष्पन्न करण्याबाबत निर्देशित केले . त्या अनुषंगाने सायबर सेल यवतमाळ , यांनी तक्रारदार यांनी फसवणुक करणारे महीलेची माहीती घेवुन तांत्रीक विष्लेशन केले असता डॉक्टरची फसवणुक करणारी महीला नसुन तो पुरुष असल्याची प्राथमीक माहीती प्राप्त झाली . प्राप्त माहीतीच्या आधारे अधिकारी व कर्मचारी यांचे पथक गठीत करुन अरुणोदय सोसायटी येथील एका घरी किरायाणे राहणाऱ्या इसमाचे घरी धाड टाकली असता सदर ठिकाणी आरोपी नामे संदेश अनिल मानकर नावाचे इसमाकडुन एक कोटी बाहत्तर लाख सात हजार रुपये नगदी व चार लाख रुपयाचे सोन्याचे दागीणे तसेच चार विविध कंपनीचे मोबाईल फोन असा एकुण १,७८,०६,१ ९ ८ ( एक कोटी अठठयाहत्तर लाख सहा हनार एकशे अठठयांनउ रुपये ) चा मुद्येमाल जप्त करण्यात यवतमाळ पोलीसांना यश आले . सदरची कार्यवाही डॉ . दिलीप पाटील – भुजबल पोलीस अधीक्षक , यवतमाळ , डॉ . के . ए . धरणे अपर पोलीस अधिक्षक , यवतमाळ यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल पुरी , सायबर सेल , सपोनि गजानन करेवाड , पोहवा गजानन डोंगरे , पोना विशाल भगत , उल्हास कुरकुटे , कविश पाळेकर , पोकॉ महमद भगतवाले , सलमान शेख , किशोर झेंडेकर , पंकज गिरी सर्व पोलीस अधिक्षक कार्यालय , यवतमाळ यांनी पार यशस्वीरीत्या पार पाडली . नागरीकांनी सोशल मीडीयाचा वापर करतांना अनोळखी व्यक्तीवर त्वरीत विश्वास ठेवुन त्यांना एन्टरटेन करण्याची किती मोठी किंमत मोजावी लागु शकते हे या घटनेतुन स्पष्ट होत असल्याने नागरीकांनी सोशल मीडीयाचा वापर करतांना सावधगीरी बाळगावी असे आवाहन यवतमाळ पोलीसांचे तर्फे करण्यात येत आहे .