युवा महोत्सव थाटात साजरी उमरखेड
युवा महोत्सव थाटात साजरी
उमरखेड
इनरव्हिल क्लब व गोपिकाबाई सिताराम गांवडे यांच्या संयुक्त मनाने आयोजित युवा महोत्सव आल्हाददायक व स्फूर्तिदायक वातावरणात गावडे महाविद्यालयात पार पडले. या युवा महोत्सवात उमरखेड परिसरातील ज्युनियर व सीनियर कॉलेजच्या विद्यार्थ्याने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या युवा महोत्सवात विविध स्पर्धाचे…ज्यात पोस्टर मेकिंग, रांगोळी, वक्तृत्व, गीत गायन व नृत्य या आयोजन करण्यात आले होते. जवळपास शंभर ते दीडशे विद्यार्थी सहभागी व शेकडो विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते. गावडे कॉलेज मध्ये 2019 मध्ये इनर व्हिल क्लब व गांवडे महाविद्यालय च्या माध्यमातून Pre- Marriage Council ची स्थापना करण्यात आली होती तेव्हापासून दरवर्षी विवाह पूर्व समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्या अनुषंगाने याही वर्षी नांदेड येथील नारायणराव लाॅ कॉलेज येथील प्रोफेसर अंजना बोकारे यांनी विस्तृत असे मार्गदर्शन केले व आपलीच कुटुंब व्यवस्था व विवाह संस्था टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असे आवाहन केले. तसेच प्रोफेसर स्वाती मिका यांनी कायदा क्षेत्रातील करिअर व संधी ह्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे महाविद्यालयाचे अध्यक्ष…श्री राम देवसरकर, सचिव डॉ. वाय.एम. राऊत , प्राचार्य डॉ माधवराव कदम , इनर व्हिल क्लब च्या संस्थापिका अध्यक्षा डॉ. विमल राऊत व रोटिरियन डॉ यमा राऊत प्रा माधवराव कदम व पत्रकार सविता चंद्रे व इनर व्हिल क्लब च्या पद अधिकारी व सदस्य उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन क्लब च्या अध्यक्षा उषा तासके व त्यांची संपूर्ण टीम व गो.सी. गावंडे महाविद्यालय उमरखेड ह्यांच्या सहकार्यातून हे कार्यक्रम यशस्वी पणे पार पडले. कार्यक्रमाची सांगता सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्लब च्या सचिवा डॉ. शीतल धोंगडे यांनी उत्तम पणे पार पाडले.आभार माधुरी देशमुख व वसुंधरा कदम मानले. राष्ट्रगीतानी कार्यक्रमाची सांगता झाली



