भुमिपूत्र अर्थमुव्हर्स असोशिएशनची कार्यकारिणी गठीत अध्यक्ष प्रसाद पाटील चौधरी तर सचिव पदी डॉ. गणेशराव जाधव उमरखेड :-
भुमिपूत्र अर्थमुव्हर्स असोशिएशनची कार्यकारिणी गठीत
अध्यक्ष प्रसाद पाटील चौधरी तर सचिव पदी डॉ. गणेशराव जाधव
उमरखेड :-
विभागातील अर्थमूव्हर्स संघटन मजबूत व्हावे,अर्थमुव्हर्सना वेळोवेळी उद्भवणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी संघटनेची विभागीय कार्यकारिणी स्थानिक शासकिय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत गठीत करण्यात आली असून,या संघटनेच्या अध्यक्षपदी प्रसाद पाटील चौधरी माहूर तर सचिव पदी डॉ.गणेशराव जाधव उमरखेड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे .
या कार्यकारणीमध्ये उपाध्यक्ष राजेश देशमुख पुसद ,कोषाध्यक्ष विनोद आडे उमरखेड तर सदस्य सर्वश्री प्रभाकर हटकर महागाव,तुकाराम बाभुळकर हदगाव ,सय्यद काशीफभाई उमरखेड,फिरोज भाई पुसद,अमोल माटवे माहूर,गोपीचंद राठोड महागाव,राजेश मुनेश्वर माहूर,विभागातील पुसद , माहूर ,महागाव, उमरखेड ‘हदगाव अशा पाच तालुक्यातील जेसीबी,पोकलॅण्ड ,ट्रेलर मालक व एजंट अर्थमूव्हींग व्यवसाय करणाऱ्या परिसरातील भूमिपुत्रांना एकत्रित करून बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या मशीन धारकांकडून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबविण्याच्या उद्देशाने सदर कार्यकारणी गठित करण्यात आल्याची माहिती नवनियुक्त सचिव डॉ .गणेशराव जाधव यांनी दिली आहे .