काँग्रेस च्या उमरखेड तालुका उपाध्यक्षपदी ढाणकी चे गजानन मिटकरे

youtube

काँग्रेस च्या उमरखेड तालुका उपाध्यक्षपदी ढाणकी चे गजानन मिटकरे

ढाणकी/ प्रतिनीधी :

येथील लिंगायत समाजातील उभरते नेतृत्व, किंगमेकर म्हणून प्रसिद्ध असलेले, सामाजिक कार्यात दानशूर म्हणून सुपरीचीत अष्टपैलू व्यक्तिमत्व, गजानन मिटकरे (आप्पा) यांची उमरखेड तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.
या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या निवडीमुळे ढाणकी येथे काँग्रेस पक्षाला लिंगायत समाजाचे विशेष करून मोठ्या प्रमाणात बळ मिळेल. अवघ्या तीन ते चार महिन्याच्या अंतरावर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या असल्यामुळे, गजानन मिटकरे यांची निवड काँग्रेस पक्षासाठी ढाणकी येथे नक्कीच निर्णायक ठरेल असा सूर जनतेतून निघत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!