राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी रामदास कांबळे तर कार्याध्यक्ष जिल्हा पदी किरण मुक्कावार यांची निवड.

youtube

*राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी रामदास कांबळे तर जिल्हा कार्याध्यक्षपदी किरण मुक्कावार यांची निवड*

यवतमाळ

येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची बैठक पार पडली यावेळी विदर्भ अध्यक्ष श्री पद्ममाकर घायवान, प्रफुल्ल मेश्राम, रवि चरडे, संतोष डोंमाळे यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारणी करण्यात आली यामध्ये राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी रामदास कांबळे तर यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्षपदी म्हणून किरण मुक्कावार यांची निवड करण्यात आली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवड प्रक्रिया सर्वानुमते पार पडली संघटना सर्वांनी मिळवून मजबूत करावी अशी प्रतिक्रिया विदर्भ अध्यक्ष पद्माकर घायवान यांनी सांगितली तसेच सचिव पदी अब्दुल रफिक यांची तर जिल्हा संघटक पदी सय्यद मुजबुद्दीन, संपर्क प्रमुख पदी प्रकाश वानखेडे, प्रसिद्धी प्रमुख पदी कुणाल आठवले, यांची निवड करण्यात आली. या बैठकीला यवतमाळ जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!