लोकनेते कै.गोपीनाथराव मुंडे यांना माहुरकरांनी वाहिली आंदरजली.

youtube

लोकनेते कै.गोपीनाथराव मुंडे यांना माहूरकरांनी वाहिली आदरांजली.

श्री क्षेत्र माहूर प्रतिनिधी :- नितीन तोडसाम
लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले या वेळी भाजपा ,तालुकाध्यक्ष अॅड.दिनेश येऊतकर,पत्रकार प्रकोष्ठ जिल्हा अध्यक्ष पद् मा गि-हे, भाजपा शहराधक्षा अर्चना दराडे, यांनी माहूर शहरातील दत्त चौकात उभारलेल्या त्यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.
स्व.गोपीनाथरावांनी सर्वसामान्यांच्या उत्थानासाठी आपले जिवन खर्च केले.अचानक रीत्या ते आपल्यातून निघून गेल्याने महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे मोठे नुकसान झाले.व असून त्यांचा आदर्श, विचाराचा सर्वांनी लाभ समाजातील शेवटच्या व्यक्तीला मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहो अन् तिच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल असे मत तालुकाध्यक्ष अँड.दिनेश येऊतकर व अनिल वाघमारे यांनी व्यक्त केले.यावेळी , वसंत कपाटे,नंदकुमार जोशी, भाजपाचे विनायक मुसळे,उमेश जाधव, अनिल वाघमारे, निळकंठ मस्के,रामकीसन केंद्रे,सदाशिव राठोड,नंदु कोलपवार, जितु चोले,सदबा मुंडे, संतोष तामखाने,कार्यकर्ते व नागरिकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

Google Ad
Google Ad

3 thoughts on “लोकनेते कै.गोपीनाथराव मुंडे यांना माहुरकरांनी वाहिली आंदरजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!