साै.मनिषा आकरे यांची हाॅकी महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी निवड.

साै.मनिषा आकरे यांची हाॅकी महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी निवड
यवतमाळ..
हाॅकी इन्डीया संलग्न असलेल्या हाॅकी महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी यवतमाळ जिल्ह्यातील साै.मनिषा सुहास आकरे याची निवड झालेली आहे. पुणे येथे दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र हॉकी संघटना यांची निवडणूक घेण्यात आली,त्यामध्ये हाॅकी असाेसिएशन आॅफ डिस्ट्रीक्ट यवतमाळच्या सचिव सौ. मनीषा सुहास आकरे यांची हॉकी महाराष्ट्र च्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून त्या विदर्भातील एकमेव महिला आहेत, त्यांना हॉकी इंडिया च्या दिल्ली येथील निवडनुकित मतदान करण्याचे अधिकार सुध्दा देण्यात आले.त्या स्वतः खेळाडू असून यवतमाळ मधील क्रीडा क्षेत्रात ही अभिमानाची व गर्वाची बाब आहे. केंद्रीय खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या आदेशाने संपूर्ण भारतात एक राज्य एक संघटना च्या कायद्यानुसार धर्मादाय आयुक्त च्या परवानगीने,
सौ.मनीषा आकरे मॅडम यांना पुढील अधिकार प्राप्त झाले.
त्यांनि आपल्या यशाचे श्रेय हाॅकी महाराष्ट्र अध्यक्ष आय. ए. एस अधिकारी कृष्ण प्रकाश ,सचिव मनिष आनंद, सिनियर उपाध्यक्ष मनाेज भाेरे, यांना देतात.जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खूरपूडे, हाॅकी असाेसिएशन आॅफ डिस्ट्रीक्ट यवतमाळ चे अध्यक्ष सतिश फाटक, विशूद्ध विघालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते, प्रा.डाॅ.राजेन्द्र क्षिरसागर, कार्यकारी अधिकारी अनिल
नायडू, उपाध्यक्ष बबलू यादव, हरीहर मिश्रा, प्रा.फ्लाेरा सिंग, मिनि थाॅमस जाॅन, काेषाध्यक्ष कून्दा आमदने, सहसचिव प्रा. डाॅ.मार्कस लाकडे, सदस्य प्रा. विकास टाेणे,सपना वानखेडे, प्रा.अभिजित पवार, निखिल गूजर, नंदा जिरापूरे, राष्ट्रीय खेळाडू , नंदुलाल पाली, जितू पाखरे, धनराज झाोंबाडे यांनी अभिनंदन केले. क्रीडा उपसंचालक विजय संतान सर यांनी विषेश काैतुक होत आहे.