वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करा (वंचित बहुजन आघाडी भिम टायगर सेनेची मागणी)

youtube

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करा
(वंचित बहुजन आघाडी भिम टायगर सेनेची मागणी)

उमरखेड.. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज , भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, यांच्या विषयी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान करणाऱ्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची राज्यपाल पदावरून, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी व भीम टायगर सेनेच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्फत भारताचे महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली,
दिनांक 16 तारखेला उमरखेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह अर्पण करून महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजपाच्या वाचाळवीरांचा निषेध करण्यात आला, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर राज्यपाल कोशारी चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला, याचेली वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जॉन्टी भाऊ विणकरे यांनी आपल्या भाषणातून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वाचाळ वीरांचा जोरदार समाचार घेत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करून त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली,
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाप्रमुख संतोष जोगदंडे, भीम टायगर सेनेचे शहर प्रमुख सिद्धार्थ दिवेकर, देवानंद पाईकराव ,शाम धुळे, प्रफुल दिवेकर, कैलास कदम, संदीप विनकरे, नितीन आठवले, रवींद्र हापसे, सुधाकर कदम, बुद्धभूषण इंगोले, विष्णुकांत वाडेकर, बाबुराव नवसागरे राजेश घुगरे , अविनाश पाईकराव राहुल तपासे आकाश कवडे, अरविंद सावते, कोंडबा वावळे, आकाश कवडे वंचित बहुजन आघाडी व भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!