पोलीस भरतीत एका पेक्षा अधिक अर्ज करणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात यावी पुरोगामी युवा ब्रिगेड व पोलीस भरतीतील तरुणांची निवेदनामार्फत शासनाकडे मागणी उमरखेड शहरात आंदोलनाचा इशारा.
पोलीस भरतीत एका पेक्षा अधिक अर्ज करणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात यावी
पुरोगामी युवा ब्रिगेड व पोलीस भरतीतील तरुणांची निवेदनामार्फत शासनाकडे मागणी
उमरखेड शहरात आंदोलनाचा इशारा
उमरखेड/ प्रतिनिधी :
महाराष्ट्रात नुकतीच पोलीस मेगा भरती झाली असून यामध्ये शासनाने एक महत्वाचा शासन निर्णय घेतला होता, ज्यामध्ये असे असे म्हटले होते की एका उमेदवाराने एकाच ठिकाणी, एकाच जागेसाठी अर्ज करावे अन्यथा तुमचा अर्ज रद्द करण्यात येईल परंतु अनेक विद्यार्थ्यांनी आपला मोबाईल नंबर व ईमेल आयडी बदलून एकापेक्षा अधिक जागी फॉर्म भरल्याचे आढळून आले आहे. ज्यांनी शासनाच्या या निर्णयाचे पालन करून एका जागीच फॉर्म भरला अश्या उमेदवारांवर हा एक प्रकारे झालेला अन्यायच असून या विरोधात पुरोगामी युवा ब्रिगेड व उमरखेड शहरातील पोलीस भरती देणाऱ्या तरुणांनी निवेदन दिले असून एकापेक्षा अधिक फॉर्म भरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी निवेदनामार्फत करण्यात आली.
बऱ्याच वर्षानंतर महाराष्ट्र शासनाने मेगा भरती जाहीर केली होती. यामुळे पोलीस भरती देऊन पोलीस होण्याचे स्वप्न बघणाऱ्या युवकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु शासनाने एक उमेदवार एक फॉर्म ही एक अट टाकली होती. परंतु अनेक विध्यार्थ्यानी याचे उल्लंघन करून दोन पेक्षा अधिक जागी फॉर्म भरूर शासनाच्या या निर्णयाला केराची टोपली दाखवली. यामुळे ज्यांनी इमानदारीने एकच फॉर्म भरला त्यांना शारीरिक चाचणीसाठी एकच संधी मिळाली होती. हा त्याच्यावर झालेला अन्याय असून येत्या काही दिवसात या संदर्भात शासनाने निर्णय नाही घेतल्यास उमरखेड शहरात आंदोलन करण्याचा इशारा पुरोगामी युवा ब्रिगेड व उमरखेड शहरात पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिला आहे.
यावेळी पुरोगामी युवा ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष शिवशंकर सुरोशे, तालुका अध्यक्ष सुनील लोखंडे, प्रवक्ता शाहरुख पठाण, अविनाश चंद्रवंशी, रुपेश टिंगरे, सत्यवान देशमुख, शकीब खान, अक्षय देशमुख, समाधान ठाकरे, सिद्धांत आडे, सौरभ राठोड, नितेश इंगोले, सुमेध खंदारे, विजय गवर,विजय शिंगणकर, कुणाल कदम, साईनाथ इंगळे, सागर शेटे, स्वप्निल सगणे, असलम शेख आदि उपस्थित होते.