सामजिक एकोब्यासाठी उमरखेड येथे पोलिसाची इफ्तार पार्टी.
सामजिक एकोब्यासाठी उमरखेड येथे पोलिसाची इफ्तार पार्टी
उमरखेड –
येथील नगरपरिषद मंगल कार्यालय येथे यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या दि 27 रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप तर प्रमुख उपस्थितीत उपविभागीय महसूल अधिकारी डॉ व्यंकट राठोड, न पा मुख्याधिकारी महेश कुमार जामनोर ,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी तसेच उपविभागातील सर्व पोलीस निरीक्षक उपस्थित होते .समाजातील सर्व घटकांमध्ये एकोबा वाढीस लागून शांतता नांदावी या विचाराने पोलिसांच्या वतीने येथील नगरपरिषद मंगल कार्यालय येथे सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले .यात उमरखेड पोलीस उपविभागाने पुढाकार घेतला होता
रोजा इफ्तार सर्व धर्मीय संमेलन पार्टीचे आयोजन उमरखेड पोलीस विभागाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांनी केले तर सूत्रसंचालन पो .का संतोष चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजाता बनसोड यांनी केले .
पोलीस अधिकाऱ्यांसह परिसरातील सुमारे 200 सर्व धर्मीय नागरिकांनी या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी होते सामाजिक एकोबा अबाधित ठेवण्याचा निर्धार केला यावेळी विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले तसेच पारंपारिक पद्धतीने अजान देण्यात आली व त्यानंतर इफ्तार पारटी ला सुरुवात झाली .
यावेळी माजी नगराध्यक्ष राजूभैय्या जयस्वाल , अँड संतोष जैन, सुरते, रमेश चव्हाण , रविकांत रुडे ,संजय बिजोरे पाटील , पाटील ,विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी पत्रकार बांधव ,पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी व सर्व शांतता कमिटीचे सदस्य व मुस्लिम बांधवसह सर्व पोलीस कर्मचारी व पत्रकार बांधव उत्साहाने उपस्थित होते . अशा आयोजनाने एकात्मता प्रेम आणि सद्भावनेचा मोठा संदेश मिळतो .असे मत अप्पर पोलीस अधीक्षक पियूष जगताप यांनी व्यक्त केले. तसेच उपविभागीय महसूल अधिकारी डॉ व्यंकट राठोड यांनी बोलताना आम्ही सर्व अधिकारी कर्मचारी अधर्मीय आहोत परंतु सर्व धर्मीयांना एकत्रित करून जातीय सलोखा ठेवण्याचे संदेश देण्याचे काम आम्ही करीत आहोत असे सांगितले .