उमरखेड तहसील कार्यालय येथे 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा.
उमरखेड तहसील कार्यालय येथे 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा
उमरखेड :
भारताचा राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले ज्यांनी हसत हसत देशासाठी बलिदान दिले असे स्वातंत्र सैनिक आणि भारत मातेच्या शूर सुपुत्रांना हा दिवस समर्पित आहे या विशेष सोहळ्यासाठी भारतभर उत्साहात साजरा केला जातो. तहसील कार्यालय येथे उपविभागीय महसूल अधिकारी व्यंकट राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा करण्यात आले. यावेळी आमदार नामदेव ससाणे तहसीलदार आनंद देऊळगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर माजी आमदार विजयराव खडसे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे सह शहरातील नागरिक व विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी माजी सैनिक , पत्रकार ,महसुल कर्मचारी उपस्थित होते
तसेच परेड आणि विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कराटे कार्यक्रमासह साजरा केला .
आजचा हा स्वातंत्र्य दिन सर्व भारतीयांसाठी राष्ट्रीय अभिमान आणि एकतेचा दिवस आहे