उमरखेड मधून हजारो मराठे मनोज जरांडे पाटलाच्या सभेस रवान सकाल मराठा समाज समन्वयक संदिप घाडगे यांची माहिती.
उमरखेड मधून हजारो मराठे मनोज जरांडे पाटलाच्या सभेस रवान
सकाल मराठा समाज समन्वयक संदिप घाडगे यांची माहिती
उमरखेड –
राज्यातील सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच मराठा समजला आरक्षण मिळावे या मागणीसाठी १४ ऑक्टोबर रोजी अतरवली सराटी येथे मराठ्याचा लाखोंचा माहासागर उसळणार आहे .मनोज जारागे पाटील यांचा नेतृत्वात हा लढा सुरू आहे. या महासभेला उमरखेड तालुक्यातून हजारो मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याचे माहिती संदिप घाडगे समन्वयक सकल मराठा समाज यांनी दिली
मनोज जारांगे पाटील यांच्या आदोलणाला पाठींबा मनून उमरखेड तालुक्यात सचिन घाडगे,शरद मगर ,गोपाळ कलाने,सुदर्शन जाधव,शिवाजी पवार या तरुणांनी बारा दिवस आमरण उपोषण केले ते उपोषण मनोज जरांदे पाटील यांचा व्हिडिओ कॉल वरून सोडण्यात आले . व बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे .उमरखेड तालुक्यातील सकल मराठा समाजाचा मोठा पाठिंबा या आंदोलनास मिळत आहे.
मराठा समाजाचा आरक्षण साठी मोठा लढा मनोज जरंगे पाटील यांनी उभारला असून त्यांनी राज्यभर केलेल्या दौऱ्यात उत्फुर्त प्रातीसात मिळाला आहे.मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासन ला १४ ऑक्टोबर रोजी एका महिना पूर्ण होत आहे .२४ ऑक्टोबर पर्यंत शसानास अल्टिमेटम देण्यात आला आहे या दहा दिवसात शासनाने कमची गती वाढवावी व सरसकट मराठा समाजास आरक्षण लागू करावे या मागणीसाठी हे भगवे वादळ शांतेतेच्या मार्गाने अंतरवली येथे धडकणार आहे .या सभेत समजला उद्देशून मनोज जारगे पाटील आपली भूमिका मांडतील.
अंतरवली येथे हजारो मराठा समाज बांधव जात असून सर्व समाज बांधवांनी सभेस शंतेतेत सुरक्षित जाण्याचे व येण्याचे आवाहन समन्वयक संदिप घाडगे यांनी केले