उमरखेड शासकिय विश्रामगृहाचे खानसामा खलीलभाई यांचे निधन.
उमरखेड शासकिय विश्रामगृहाचे खानसामा खलीलभाई यांचे निधन
उमरखेड : –
येथील शासकिय विश्रामगृहाचे खानसामा शेख खलील शेख उस्मान (खलीलभाई ) यांचे वयाच्या 56 व्या वर्षी दि. 6 जानेवारी रोजी सकाळी 8:30 वाजताचे दरम्यान कर्तव्य बजावित असतांना विश्रामगृहावर आलेल्या अधिकार्यांच्या चहापाणाची व्यवस्था करण्याच्या धावपळीत जमीनीवर कोसळले तेव्हा ह्रदय विकाराचा तिव्र झटका आल्याने त्यांना शासकिय रुग्णालयात हलविले तेथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत्त घोषित केले . खलीलभाई हे विश्रामगृहावर येणाऱ्या अधिकारी व कार्यकर्त्यांची हसत खेळत सरबराई करायचे कोणाची काही किंमती वस्तु विसरून राहिल्यास त्याचेशी संपर्क साधून त्यास परत करायचे त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे त्यांच्याबद्दल सर्व स्तरांवर आदरभाव होता . त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा भाऊ असा परिवार आहे . त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .



