कावड यात्रेतील मृत विशाल पवार यांच्या कुटुंबीयांना ट्रस्टकडून १ लाखांची मदत – जखमी कावडधारकांच्या उपचारासाठीही आर्थिक मदत; दहीहंडी महोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश पत्रकार परिषदेत माहिती देताना नितीन भुतडा
कावड यात्रेतील मृत विशाल पवार यांच्या कुटुंबीयांना ट्रस्टकडून १ लाखांची मदत –
जखमी कावडधारकांच्या उपचारासाठीही आर्थिक मदत; दहीहंडी महोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
पत्रकार परिषदेत माहिती देताना नितीन भुतडा
उमरखेड : स्व. प्रमोद महाजन चॅरिटेबल ट्रस्ट व स्वातंत्र्यसैनिक बंकटलाल भुतडा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारा विदर्भातील भव्य दहीहंडी महोत्सव यंदा रविवार, दि. १३ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद मैदानावर होणार आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टने सामाजिक बांधिलकी जपत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे.
रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी रात्री नागपूर-तुळजापूर महामार्गावरील बायपासवर कावड यात्रेकरूंना क्रूझर वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत कावडधारक विशाल पवार यांचा जागीच मृत्यू, तर अनेक कावडधारक जखमी झाले होते.
या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या विशाल पवार यांच्या कुटुंबीयांना ट्रस्टच्या वतीने १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात येणार असल्याची घोषणा दहीहंडी महोत्सवाचे संयोजक नितीन भुतडा यांनी केली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
यासोबतच अपघातात जखमी झालेल्या कावडधारकांच्या औषधोपचारासाठी आवश्यक ती आर्थिक मदत ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येईल, असेही नितीन भुतडा यांनी स्पष्ट केले.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाही मदतीचा हात
पत्रकार परिषदेत राज्यासह तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवरही चर्चा करण्यात आली. संकटग्रस्त शेतकऱ्यांना ट्रस्टच्या माध्यमातून शक्य ती मदत करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना शासनाकडून आवश्यक मदत मिळावी यासाठी शासनाकडे मागणी करण्यात येईल, असे भुतडा यांनी सांगितले.
दहीहंडी महोत्सव हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम न राहता सामाजिक बांधिलकी आणि माणुसकी जपणारा उपक्रम म्हणून राबविण्याचा ट्रस्टचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पत्रकार परिषदेला आमदार किसनराव वानखेडे, नगरपरिषद गटनेते विजय हरडफकर, नगरसेवक गोपाल कलाने, ॲड. जितेंद्र पवार, डॉ. प्रतीक रुडे, बाळासाहेब भट्टड व बबलू जाधव धनराज वानखेडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


Sau khi được bạn bè giới thiệu netmirror online , mình thử trải nghiệm và thấy giao diện hoạt động khá ổn định. TONY09-18
Wrire more, thatrs aall I havce too say. Literally, it eems as though yoou reliied oon thhe video too mazke yyour point.
Yoou definitely knnow wwhat youre talking about, whhy wast yoiur intelloigence
on jusst postig videos too yur webloog when yoou could be giiving uss something informative tto
read? xnxx