तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील बायपास उड्डाणपुलावर भीषण अपघात कावड यात्रेतील भाविकाचा जागीच मृत्यू; आठ ते दहा जण गंभीर जखमी उमरखेड :
तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील बायपास उड्डाणपुलावर भीषण अपघात
कावड यात्रेतील भाविकाचा जागीच मृत्यू; आठ ते दहा जण गंभीर जखमी
उमरखेड : तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील बायपास उड्डाणपुलावर रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कावड यात्रेतील एका भाविकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर आठ ते दहा भाविक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे उमरखेड शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
श्रीक्षेत्र उनकेश्वर येथून उमरखेडकडे येत असलेल्या जय श्री महाकाल कावड यात्रेत महिला, पुरुष व तरुणांसह सुमारे २० ते २५ भाविक सहभागी झाले होते. ही कावड यात्रा उमरखेडच्या दिशेने येत असताना माहूरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या क्रुझर वाहनाने (क्रमांक एमएच २६ ए.के. ७३६७) कावड यात्रेसोबत असलेल्या ऑटोला पाठीमागून जोरदार धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे.
ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात कावड यात्रेतील भाविक विशाल दीपक पवार (वय ३४, रा. नाग चौक, उमरखेड) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर आठ ते दहा भाविक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस व रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना त्वरित उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
या भीषण अपघाताची माहिती शहरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी तसेच उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, काही नागरिकांनी या अपघाताबाबत संताप व्यक्त केला असून, रात्रीच्या वेळी बायपास परिसरात पुरेसा प्रकाश नसल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बायपास परिसरातील बंद असलेले पथदिवे तातडीने सुरू करून परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणी संबंधित पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.


The installation was a breeze and the app runs perfectly on my Android. No lags or crashes so far. Highly recommend getting lucky98gamedownloadapk for a better mobile experience.
Đây là lựa chọn khá tốt cho game thủ movieblast download apk TONY09-18
Thhis text is worth everyone’s attention. Howw ccan I find ouut more?
xnxx