वसंत साखर कारखान्याच्या मळीचे पाणी पैनगंगा नदी पात्रात लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
वसंत साखर कारखान्याच्या मळीचे पाणी पैनगंगा नदी पात्रात
लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात
दूषित पाण्यामुळे मृत मासोळीचा नदीपात्रात पडला खच
नगरपरिषद प्रशासन अनभिज्ञ
उमरखेड : – ( उमरखेड शहर प्रतिनिधी ). वसंत सहकारी साखर कारखान्याच्या मळीचे पाणी पैनगंगा नदी पात्रात आल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधार्यातील पाणी दूषित होऊन त्या पाण्याचा शहराला पाणीपुरवठा होत असल्यामुळे शहरातील तसेच विदर्भ मराठवाड्यातील नदीकाठावरीलगावातील आरोग्य धोक्यात आले आहे याबाबत नगरपरिषद प्रशासन अनभिज्ञ असून याबाबत नागरिकात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे
वसंत कारखान्यातील मळीचे पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडल्यामुळे नदीपात्रातील हजारो मासोळ्यांना आपला जीव गमवावा लागला तसेच याच पात्र मध्ये उमरखेड शहराला पाणीपुरवठा करणारा बंधारा असून या बंधाऱ्यांमध्ये घाण पाणी जमा होऊन तेच पाणी उमरखेड शहराला पाणीपुरवठ्याद्वारे पोहोचत असल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे वसंत सहकारी साखर कारखाना आपले पाणी पळशी जवळील मिळवणे नाल्यात सोडते त्या नाल्यातून पैनगंगा नदीपात्रात पाणी आल्याने पळशी नागापूर 12 कैलास नगर बेलखेड या गावातील नागरिक वासाने त्रस्त असून बंधाऱ्यात सदर दूषित पाणी जमा झाल्याने आज पासून सदर पाणी खाली सोडण्यात येत आहे यामध्ये बंधाऱ्याखालील करोडी संगम चिंचोली काळेश्वर देवा लिंग गव्हाण या गावांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागत आहे सदर दूषित पाणी चार दिवसापासून नदीपात्रात येत असताना मात्र याची माहिती नगरपालिकेला लागली नाही या बाबीचे नागरिकाकडून आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे .
चौकट
नगरपालिकेचे प्रशासकीय राज उठले नगरवासीयांच्या मुळावर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, वसंत कारखान्याचे दूषित पाणी पेनगंगा नदी पात्रात आल्यामुळे उमरखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात दूषित पाणी जमा होऊन नदीतील मासे मरण पावले आणि त्याच दूषित पाण्याचा पाणीपुरवठा नगरपालिकेमार्फत शहरवासीयांना मागील दोन दिवसापासून होत असून ह्या दूषित पाण्याला उग्र स्वरूपाचा वास येत असल्याची चर्चा शहरातील नागरिकांतून काल दिवसभर ऐकायला येत होती ज्या दूषित पाण्यामुळे नदीपात्रातील मासोळ्या मृत्युमुखी पडल्यात त्याच दूषित पाण्याचा पुरवठा शहरातील नागरिकांना नगरपालिकेकडून केल्या जात असल्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून या बाबीचे गांभीर्य मात्र नगरपालिका प्रशासनाने अद्याप पर्यंत घेतले नसल्यामुळे नगरपालिकेवर असलेले प्रशासकीय राज शहरातील जनतेच्या मुळावर उठले की काय? अशा संतप्त प्रतिक्रिया उमरखेड शहरवासी यातून उमटत असल्याचे दिसत आहे
The Beatles – легендарная британская рок-группа, сформированная в 1960 году в Ливерпуле. Их музыка стала символом эпохи и оказала огромное влияние на мировую культуру. Среди их лучших песен: “Hey Jude”, “Let It Be”, “Yesterday”, “Come Together”, “Here Comes the Sun”, “A Day in the Life”, “Something”, “Eleanor Rigby” и многие другие. Их творчество отличается мелодичностью, глубиной текстов и экспериментами в звуке, что сделало их одной из самых влиятельных групп в истории музыки. Музыка 2024 года слушать онлайн и скачать бесплатно mp3.