आमदार ससानेकडून २५ हजार विद्यार्थ्यांना होणार मोफत शैक्षणिक अँप चे वितरण.
आमदार ससानेकडून २५ हजार विद्यार्थ्यांना होणार मोफत शैक्षणिक अँप चे वितरण
प्रतिनिधी
उमरखेड :
उमरखेड – महागाव विधानसभा मतदारसंघात आमदार नामदेव ससाने यांच्या संकल्पनेतून जवळपास २५ हजार विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक ॲप चे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे .
आज या मोफत शैक्षणिक ॲपचा शुभारंभ स्थानिक गुरुदेव गोरोबा विद्यालय व साकळे विद्यालयातून करण्यात आला.
इयत्ता पाचवी ते दहावीच्या मराठी , इंग्रजी , सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी हा अँप अत्यंत उपयुक्त असून ‘ सहज शिक्षा लर्निंग ॲप ‘असे नाव आहे .याची बाजारात किंमत सात हजार रुपये असून आमदार नामदेव ससाने यांनी मोफत अँप देऊन डाउनलोड करण्याची सुविधा विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे .
यावेळी बोलताना आमदार नामदेव ससाने म्हणाले की ,शिक्षण हा सर्वांचा जिव्हाळ्याचा व अत्यंत आवश्यक घटक आहे मात्र आपल्या ग्रामीण भागात शाळाबाह्य शिक्षणासाठी पुरेशा सोयी उपलब्ध होत नाही आणि जे सुविधा उपलब्ध आहेत त्यासाठी येणारा खर्च अनेकांना परवडणारा नाही तथापि आजच्या डिजिटल युगात सर्वत्र मोबाईल किंवा टीव्ही सारखी साधने उपलब्ध आहेत या साधनांचा उपयोग करून शिक्षण घेता आले तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत वाढ होईल म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या डिजिटल इंडिया या अभियानाला अनुसरून मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ व्हावी यासाठी सहज शिक्षा लर्निंग एप्लीकेशन अतिशय उपयुक्त ठरणारे राहणार आहे असे सांगून आमदार ससाने म्हणाले की , प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घराघरात वर्षभर त्यांना हवा असणारा अभ्यास मित्र म्हणून हे शैक्षणिक अँप विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत देत असल्याचे सांगितले .अँप च्या वापरा बद्दल सहज शिक्षा अँप चे सीईओ विशाल अमलापुरकर पुणे यांनी केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा शहराध्यक्ष प्रकाश दुधेवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून साकळे विद्यालयाचे शाळा व्यवस्थापक अंबादास साकळे ,श्रीधर पाटील देवसरकर , मेहरे पाचकोरे,व शिक्षक वृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन पी के गायकवाड सर यांनी तर आभार श्री भोयर सर यांनी मानले .
सोबत फोटो :
सहज लर्निंग ॲप चे विमोचन करताना आमदार नामदेव ससाने विद्यार्थ्यांसमवेत