पोलीस स्टेशन उमरखेड परीसरात अग्नीशस्त्र (गावठी बनावटी पिस्टल) बाळगणाऱ्या दोघास घेतले ताब्यात डिटेक्शन बँच (DB) उमरखेड यांची कार्यवाही.
पोलीस स्टेशन उमरखेड परीसरात अग्नीशस्त्र (गावठी बनावटी पिस्टल) बाळगणाऱ्या दोघास घेतले ताब्यात डिटेक्शन बँच (DB) उमरखेड यांची कार्यवाही
उमरखेड
मा. पोलीस अधिक्षक सो.याच्या अवैध अग्निशस्व विरुध्द कारवाई करणे संबंधाने दिलेल्या निर्देशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गाकवाड सा.व पोनि शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात दि. 23/02/2024 रोजी डिटेक्शन बॅच प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनिल सावळे सोबत डी बी पथक यांनी गुन्हेगारी शोध अवैध धंदे कार्यवाही पाहीजे असलेले आरोपी अवैध शस्व शोध घेणे कामी उमरखेड हहोत पेट्रोलींग करीत असतांना मुखबीरद्वारे माहिती मिळाली की, दोन इसम उमरखेड- हदगाव रोडवर गावठी बनावटी पिस्टल बाळगुण आहे. अशी गोपनीय माहिती मिळाल्याने श्रीनिवास धाव्याजवळ दोन इसम एक MH-26-CB-2170 होंडा अॅक्टीव्हा गाडीवर बसुन हदगाव रोडने भरधाव वेगात जात असतांना सदर आरोपींचा 4 ते 5 km पाठलाग करुन सदर आरोपीस थांबवुन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता आरोपी क्र. 1. फेरोज खान अन्सार खान, वय-32 वर्षे, रा. जुना बस स्टेशन हदगाव ता. हदगाव जि.नांदेड याचे कमरेला एक गावटी बनावटीचे पिस्टल मिळुन आली. व सोवत आरोपी क्र 2. मुस्ताकखों उर्फ राजा खमरखॉ पठाण, वय-22 वर्षे, रा.जुना बस स्टेशन हदगाव ता. हदगाव जि.नांदेड या दोघांना व एक MH-26-CB-2170 होंडा अॅक्टीव्हा व गावठी पिस्टल असा एकुण 90000/- रुपये चा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेतले. असुन पो.स्टे उमरखेड अप.क्र. /2024 कलम 3,25,35 शस्त्र अधिनियम 1959 गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास सुरु आहे.
सदर कार्यवाही यवतमाळ पोलीस अधिक्षक श्री पवन बनसोड साहेब, मा. अप्पर अधिक्षक श्री पियुष जगताप साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड सा., पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे.उमरखेड डी बी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनिल सावळे, परि पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे, पोहवा/2020 संदिप ठाकुर, पोहवा/2071 मोहन चाटे, पोका/137 अंकुश दरबस्तेवार पो.स्टे. उमरखेड तसेच RCP पथकाचे 4 अंमलदार नापोका/2076 विनोद पांडे, पोका/1121 विशाल जाधव, पोका/1187 विवेक धोंगडे, पोका/126 नवनाथ कल्याणकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
Very interesting subject, appreciate it for putting up.Raise your business