मोरचंडी उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा गटशिक्षणाधिकारी कार्यालयावर ठिय्या शिक्षकाच्या मागणीसाठी पालकांची आक्रमक भूमिका

youtube
  1. मोरचंडी उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा गटशिक्षणाधिकारी कार्यालयावर ठिय्या

शिक्षकाच्या मागणीसाठी पालकांची आक्रमक भूमिका

उमरखेड :-
पैनगंगा अभयारण्य परिसरातील अतिदुर्गम भागातील मोरचंडी उच्च प्राथमिक शाळेला शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे .अतिदुर्गम भागातील खड्डेयुक्त रस्त्याने पायपीट करीत पालकांसह विद्यार्थ्यांनी उमरखेड पंचायत समिती कार्यालयातील गटशिक्षणाधिकारी कार्यालय गाठले व शिक्षक द्या शिक्षक द्या हो अशा घोषणा देत त्यांनी तेथे राष्ट्रगीत व परिपाठ घेऊन ठिय्या आंदोलन केले यावेळी पालकांनी आक्रमक पवित्रा घेत शिक्षणाधिकाऱ्यांना धारेवर धरले .
त्यांच्या या मागणीच्या उपलब्धतेनुसार तेथे कंत्राटी चार शिक्षकांची नियुक्ती करू तात्काळ दोन शिक्षकांची तेथे नियुक्ती केल्याचे लेखी आश्वासन गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवार यांनी दिल्यामुळे पालकांचे समाधान झाले व त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले .
इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत असलेल्या या शाळेला चार शिक्षक रेकॉर्डवर कार्यरत असून केवळ दोन शिक्षक येथे कार्यरत आहेत त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत . यावेळी शिक्षण विभागाच्या उदासीन धोरणामुळे पैनगंगा अभयारण्य क्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये येण्यास शिक्षक धजावत नाहीत त्यामुळेच तेथे शिक्षकांची उणीव असल्याने आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होण्याच्या भीतीने पालकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांसमोर आपल्या व्यथा व्यक्त केल्या . शासनाच्या उदासीन धोरणामुळे ग्रामीण भागातील मुले शिक्षण घेण्याऐवजी नक्षलवादी होऊन गुन्हेगारी मार्गाकडे वळावे का ?असा संतप्त सवाल करीत पालकांनी गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड यांना चांगलीच धारेवर धरले होते .गटशिक्षणाधिकारी यांनी तात्काळ दोन शिक्षकांची नियुक्ती केल्याची पत्र सर्वांसमोर वाचून दाखविले त्यामुळे पालकांनी आपले आंदोलन मागे घेतले . यावेळी मोरचंडी येथील काही पालकांनी व सामाजिक कार्यकर्ते विद्वान केवटे ,बबलू जाधव यांनी शासनाच्या शैक्षणिक धोरणाबाबत सडकून टीका केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!