लाडकी बहीण योजनेत लागणाऱ्या शालेय कागदपत्र साठी मुख्याध्यापकाकडून अवाजवी सक्तीची वसुली ; मरसुळ च्या जिल्हा परिषद शाळेतील प्रकार 

youtube

लाडकी बहीण योजनेत लागणाऱ्या शालेय कागदपत्र साठी मुख्याध्यापकाकडून अवाजवी सक्तीची वसुली ; मरसुळ च्या जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

उमरखेड –
राज्य शासनाकडून लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली असून या योजनेचे प्रकरण तयार करण्यासाठी लाडक्या बहिणींना लागणारे शालेय पुरावा कागदपत्र जोडणे तेवढेच आवश्यक असल्याने सदर लाभार्थी बहिणींनी जिल्हा परिषद शाळेत कागदपत्र काढण्यासाठी धाव घेतली असतांना येथील शाळेचे मुख्याध्यापक सुभाष भालेराव यांनी स्वतः कडिल मनमानी चालवून सामान्य गरजवंत लाभार्थ्यांकडे न पाहता ४०० ते ५०० रुपये ऐवढया प्रमाणात अतिरिक्त वसुली करून लाभार्थ्यांना आर्थिक रित्या जेरीस आणले असल्याबाबतची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती उमरखेड यांच्याकडे दिलेल्या लेखी निवेदनातून नुकतीच करुन संबंधीता विरुद्ध कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे अनेक गावांमध्ये अशा प्रकारचे लाभार्थी असून कित्येक गावांमध्ये नाममात्र अल्प प्रमाणात शुल्क आकारून टी सी, बोनाफाईड, निर्गम उतारा ,अधिक चे कागदपत्रे सक्ती न करता सहजपणे देऊन टाकल्याची उदाहरणे समोर येत आहेत मात्र मरसुळ येथील मुख्याध्यापक यांनी स्वतःच्या अधिकाराचा बडगा दाखवीत लाभार्थी महिलांकडून चारशे ते पाचशे रुपये सक्तीची शुल्क आकारणी करुन सामान्य लाभार्थ्यांना वेठीस धरले आहे
या सक्तीच्या वसुली संदर्भात गावातील लाभार्थ्यांचे नातेवाईक येथील जिल्हा परिषद शाळेच्या संबंधित मुख्याध्यापकाकडे गेले असताना त्यांनी या मनमानी पद्धतीच्या शुल्क आकारणी संदर्भात शासन आदेशाची मागणी केली असता सदर मुख्याध्यापकाने अशा प्रकारचा आदेश न दाखविता उडवा उडवीची उत्तरे देऊन त्यांना परत केले श्रीदत्तनगर येथील नागोराव धोंडोबा वाघमारे यांनी राष्ट्रीय स्वतंत्र दिन उत्सव औचित्य साधून येथील शाळेत शिक्षण घेणाऱ्या सामान्य व गरीब विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य दप्तर, पुस्तके ,पेन, व वह्या खरेदी करून १५ ऑगस्ट दिनी वाटप करण्यासाठी २० हजार रुपयाची देणगी दिली होती मात्र सदर मुख्याध्यापकाने सुचविल्याप्रमाणे अद्याप पर्यंत कोणत्याही पात्र विद्यार्थ्याना देणगीच्या पैशातून साहित्य वाटप केले नाही त्यामुळे त्यांच्या कार्यावर शंका निर्माण झाली आहे येथील शाळेच्या पोषण आहार स्वयंपाक गृहासमोर घाणीचा उकंडा असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अशा प्रकारच्या मुख्याध्यापकाकडून मनमानी पद्धतीचा कारभार केल्या जात आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकात या कार्याविषयी कमालीची चिंता निर्माण झाली आहे
संबंधित मुख्याध्यापक यांनी केलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी गावातील नागरिक उकंडा बनसोड यांनी २२ ऑगस्ट रोजी गटविकास अधिकारी यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडे दिलेल्या लेखी निवेदनातून केली आहे .
———–

Google Ad
Google Ad

12 thoughts on “लाडकी बहीण योजनेत लागणाऱ्या शालेय कागदपत्र साठी मुख्याध्यापकाकडून अवाजवी सक्तीची वसुली ; मरसुळ च्या जिल्हा परिषद शाळेतील प्रकार 

  1. I have been browsing online more than three hours today yet I never found any interesting article like yours It is pretty worth enough for me In my view if all website owners and bloggers made good content as you did the internet will be a lot more useful than ever before

  2. Somebody essentially lend a hand to make significantly posts I might state That is the very first time I frequented your web page and up to now I surprised with the research you made to create this particular put up amazing Excellent job

  3. Ive read several just right stuff here Certainly price bookmarking for revisiting I wonder how a lot effort you place to create this kind of great informative website

  4. I have read some excellent stuff here Definitely value bookmarking for revisiting I wonder how much effort you put to make the sort of excellent informative website

  5. Thank you for the auspicious writeup It in fact was a amusement account it Look advanced to more added agreeable from you By the way how could we communicate

  6. Magnificent beat I would like to apprentice while you amend your site how can i subscribe for a blog web site The account helped me a acceptable deal I had been a little bit acquainted of this your broadcast offered bright clear idea

  7. Tech to Trick naturally like your web site however you need to take a look at the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling problems and I find it very bothersome to tell the truth on the other hand I will surely come again again.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!