ऊस उत्पादकांना त्रास देणाऱ्यांची गय केल्या जाणार नाही- आ.,किसनराव वानखेडे ऊस उत्पादकांच्या प्रश्नांसाठी एसडीएम कार्यालयात बैठक संपन्न उमरखेड प्रतिनिधी-/

ऊस उत्पादकांना त्रास देणाऱ्यांची गय केल्या जाणार नाही- आ.,किसनराव वानखेडे ऊस उत्पादकांच्या प्रश्नांसाठी एसडीएम कार्यालयात बैठक संपन्न
उमरखेड प्रतिनिधी-/
ऊस उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उमरखेड विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे व भाजपा नेते नितीन भुतडा यांनी उमरखेड महागाव तालुक्यात कार्यरत साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांना धरले धारेवर..
यावेळी उमरखेड उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी जळीत उसास सुपर करावा, जळीत उसास सुद्धा फ़्रेश उसाचा दर लागू करावा.,ऊस उत्पादकांचा तात्काळ विनाविलंब तोड करून वहन करण्यात यावे,ऊस उत्पादकांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी विविध उपाय योजना करावी,ऊसतोड कामगार पळून गेल्यास त्यांना शेतकरी व वहन करणारे गाडी मालक यांना बसणाऱ्या आर्थिक भुर्दंडाची हमी संबंधित कारखान्याच्या व्यवस्थापकी संचालकांनी घ्यावी., ज्या परिसरात ऊसतोड करणारे हार्वेस्टिंग मशीन आहे,तेथील पूर्ण ऊसतोड झाल्याशिवाय हार्वेस्टिंग मशीन तेथून हलवू नये., शेतकऱ्यांचे ऊसाचे पेमेंट व तोड वाहतूक ऊस वहन झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत देण्यात यावे.,कारखाना बंद झाल्यानंतर ऊसतोड वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांचे कमिशन डिपॉझिट एका महिन्याच्या आत देण्यात यावे.,तोड मशीन/केन हार्वेस्टरची संख्या वाढविण्यात यावी याबाबत आमदार किसनराव वानखेडे यांनी सूचना केल्या.
तरयवतमाळ, पुसद जिल्ह्याचे समन्वयक नितीन भुतडा यांनी राज्यात उसाचे जादा उत्पादन केवळ यवतमाळ व नांदेड या दोन जिल्ह्यातच आहे. त्यात उमरखेड व महागाव या फोन तालुक्यात मोठ्याप्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी आहे. त्याअनुषंगाने सर्व साखर कारखान्यांना उमरखेड विधानसभेतूनच ऊसाची संजीवनी पुरविली जात असल्यामुळे कारखादारांनी हमी भाव जास्त देत विनाविलंब उसाची रक्कम शेतकऱ्यांना द्यायला हवी.तसेच पुढील हंगामाची कार्येक्रम पत्रिका देखील जाहीर करून प्रत्येक ऊस उत्पादकांना द्यायला हवी अशी सूचना केली.
स्थानिक ऊस उत्पादकांना त्रास होता कामा नये अशी तंबी देखील यावेळी भुतडा यांनी भरली.
ऊस उत्पादकांच्या प्रश्नांबाबत दि.20 जानेवारी 2025 रोजी उमरखेड उपविभागीय अधिकारी यांचे दालनात आयोजित बैठकीत उपस्थित सुभाष शुगर फॅक्टरी प्रा.लिमिट्स हडसनी ता.हदगाव जि.नांदेड , युनिट क्रमांक– 1 चे एमडी मधुकर पतंगे, भैरवनाथ शुगर प्रा.ली., भाडेतत्व वसंत सहकारी साखर कारखाना,पोफाळीचे एमडी दिनेश परमार, नॅचरल शुगर युनिट क्रमांक 2, गुंज ता.महागाव येथील एमडी कदम,डेक्कन शुगर फॅक्टरी, बोदेगाव ता.यवतमाळचे एमडी ए. बी.कदम, शिवूर शुगर फॅक्टरी, वाकोडी ता.कळमनुरी जि.हिंगोली, युनिट क्रमांक- 2 चे एमडी देशमुख, स्व भाऊराव चव्हाण साखर कारखाना युनिट क्र.2, डोंगरकडा जि.नांदेडचे एमडी पाटील, टोकाई सह साखर कारखाना, वसमत जि.हिंगोलीचे एमडी गुणवंत हाराळे
इत्यादी साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांना उमरखेड विधानसभेतील ऊस उत्पादकांना त्रास देणाऱ्यांची गय केल्या जाणार नाही असा सज्जड दम यावेळी आमदार किसनराव वानखेडे यांनी भरला.
gab I do not even understand how I ended up here, but I assumed this publish used to be great
Hi Neat post There is a problem along with your website in internet explorer would test this IE still is the market chief and a good section of other folks will pass over your magnificent writing due to this problem