कवाने इन्स्टिट्यूट उमरखेड आयोजित तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद
कवाने इन्स्टिट्यूट उमरखेड आयोजित तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद
उमरखेड 2025:- कवाने इन्स्टिट्यूट उमरखेड येथे आयोजित तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या वर्षीच्या स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यामुळे संस्थेच्या शैक्षणिक कार्याने एक नवी उच्चता गाठली आहे.
स्पर्धेच्या आयोजनाबाबत बोलताना कवाने इन्स्टिट्यूट चे संचालक अमोल कवाने सर मनाले की ” सामान्य ज्ञान हे विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी आम्ही या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेने विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची गोडी वाढवली असून यावर्षीची स्पर्धा खूप यशस्वी ठरली.”
सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन प्रत्येक वर्षी करण्यात येते आणि या वर्षीचा प्रतिसाद नेहमीपेक्षा अधिक उत्तम होता विद्यार्थी विविध विषयांमध्ये प्रश्नांची उत्तरे देऊन आपली ज्ञान मांडत होते. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि विशेष पुरस्कार दिले जातील असे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमाला कवाने इन्स्टिट्यूट चे सहकारी श्री यशवंत गिरी सर ॲड. विलासराव देवसरकर साहेब, अभिजीत बलखंडे सर, पुंडलिक गोरे सर, मंगेश नरवाडे सर, रामकिसन गुद्दे सर,अतुल कवाने सर बंटी भाऊ गिरी तसेच कवाने इन्स्टिट्यूट चे विद्यार्थी व इतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



