गोवंश मांसाची वाहतुक करणा-या इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ( महागाव तालुक्यातील पेढी येथील घटना)

गोवंश मांसाची वाहतुक करणा-या इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
( महागाव तालुक्यातील पेढी येथील घटना)
महागाव:-
गोवंश मांसाची चारचाकी वाहनाद्वारे वाहतुक करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे
महागाव तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना पेढी येथील शेख अकील शेख मिरांजी हा त्याचे चारचाकी वाहनांतून गौवंश मांसची वाहतुक करीत असल्याची गोपनीय माहीती मिळाली असता पथकातील कर्मचाऱ्यांनी पेढी-पोखरी रोडवर सापळा रचुन वाहन क्रमांक एम एच ०५एजे ६५२१थांबवून चेक केले असता त्यामध्ये११० किलो गोवंश मांस प्रतिकिलो २४०प्रमाणे असा एकूण २६,४०० रू.व सदर वाहन किंमत रु १लाख रु असा एकूण १लाख २६,४०० रु. चा मुद्देमाल पशू वैदयकिय अधिकारी यांचा अभिप्राय घेवून त्याप्रमाणे पंचनामा करुन शेख अकील शेख मिरांजी (वय ४३ वर्ष) रा. पेढी ता. महागांव जि. यवतमाळ याला अटक करून त्याच्या विरुध्द पोलीस स्टेशन महागांव येथे गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता ,अप्पर पोलिस अधिक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, स्थागुशा पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात सपोनि धिरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे, पोहवा संतोष भोरगे, स.फौ.मुन्ना आडे, पोहवा तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार ,रमेश राठोड, चा पोउपनि रविंद्र श्रीरामे, पो.शि. सुनील पंडागळे,राजेश जाधव यांनी केली आहे.
Turkey nightlife tours Turkey vacation packages exceeded all expectations. Professional organization and authentic cultural experiences. https://americaneduforce.edu.vn/?p=2117