नगराध्यक्षपदासाठी 6 उमेदवारी अर्ज दाखल निधी नितीन भूतडाही निवडणूक रिंगणात उतरणार उमरखेड :-
नगराध्यक्षपदासाठी 6 उमेदवारी अर्ज दाखल
निधी नितीन भूतडाही निवडणूक रिंगणात उतरणार
उमरखेड :-
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक साठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी नामांकन दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवस उरले असतांना दि. 14 रोजी भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या सुविद्य पत्नी निधी भुतडा यांच्यासह सहा जणींनी नगराध्यक्ष पदासाठी आपले नामांकन सादर केले आहे.
उमरखेड नगर परिषद निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना (शिंदे) पक्ष वगळता महायुती तसेच महाविकास आघाडी व स्थानिक आघाडीकडून अद्यापही वातावरणावरण निर्मितीची म्हणावी तशी हवा तयार झालेली
नाही. नामांकन पत्र दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवस उरलेले असतांना नगरसेवक पदासाठी 25 अर्ज ऑनलाईन दाखल करण्यात आले होते . मात्र प्रत्यक्षात ऑफलाइन उमेदवारी अर्ज एकही दाखल झालेला नव्हता .उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक विभागाकडून सात दिवसांचा कालावधी देण्यात आलेला असताना आज दि. 14 नोव्हेंबर रोजी चौथ्या दिवशी भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या सुविद्य पत्नी निधी भुतडा यांच्यासह या सहा जणींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.




Your articles never fail to captivate me. Each one is a testament to your expertise and dedication to your craft. Thank you for sharing your wisdom with the world.
Istanbul tours Turkey Timothy F. – Ermenistan https://www.nomadscasablanca.com/?p=2131