नगर परिषदेच्या उर्दू शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात देशद्रोही गाण्यावर नृत्य भाजपा नगरसेवक गोपाल कलाने यांची पोलिसात तक्रार दाखल ; भाजपाने पत्रकार परिषदेतून दिली सविस्तर माहिती
नगर परिषदेच्या उर्दू शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात देशद्रोही गाण्यावर नृत्य
भाजपा नगरसेवक गोपाल कलाने यांची पोलिसात तक्रार दाखल ; भाजपाने पत्रकार परिषदेतून दिली सविस्तर माहिती
उमरखेड :- येथील नगर पालिकेच्या अब्दुल गफूर शाह उर्दू शाळा क्रमांक 2 येथे 26 जानेवारी च्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम 31 जानेवारी रोजी झाला असून या कार्यक्रमात देश विरोधी गीताचे विद्यार्थ्याकडून गायन व नृत्य करून घेणाऱ्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस महेश काळेश्वरकर यांनी आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमधून केली.
नगर परिषद अंतर्गत उर्दू शाळेत ए मर्द ए मुजाहिद तेरी यलगार कहा है हे पाकिस्तानी गाणे असून देशात प्रतिबंधित गाण्याच्या यादी मध्ये सदर गाणे असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला सदर गाण्यामध्ये लोकांना तलवार कोठे आहे ? असे विचारून लोकांना तलवार उठवा अशी चिथावणी देण्यात येत आहे. हे लोकांना देशाच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी उग्र प्रेरित करत आहे. कारण हे गाणे 1965 मधील भारत पाकिस्तान युद्ध दरम्यान खूप प्रसिद्ध झालं होतं. असेही यावेळी काळेश्वरकर म्हणाले. पाकिस्तानकडून त्यांच्या नागरिकांना व सैनिकांना युद्धासाठी प्रवृत्त करण्यासाठी वापरले गेलेले गीत असून आजही पाकिस्तानमध्ये लष्करी व राष्ट्रीय समारंभात सदर गीत गायले जाते. निरागस बालकाकडून देशविरोधी गाण्यावर नृत्य करवून घेणारे मुख्याध्यापक, शिक्षक हे देश विरोधी कृत्य करत आहे तसेच हे संविधान आर्टिकल 28 च्या विरोधी सुद्धा आहे. कारण सरकारी शाळेत अशा प्रकारचे धार्मिक गाणे वाजवण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
शालेय विद्यार्थ्याकडून अशा स्वरूपाचे गीत गायन व नृत्य करून घेणे हे भारताच्या सार्वभौमत्वाविरोधात भावना निर्माण करणारे सामाजिक व धार्मिक तेढ वाढविण्याच्या उद्देशाने केलेले तसेच विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर देश विरोधी विचार रुजविण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येते. सदर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या ठिकाणी नगरपरिषद पदाधिकारी तसेच नगराध्यक्ष, शिक्षण सभापती , नगरसेवक यांच्या समक्ष गीत चालू असताना सुद्धा त्यांनी थांबविण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. अप्रत्यक्ष त्याला समर्थनच दिले. त्यामुळे सदर प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित शिक्षक, शाळा प्रशासनातील जबाबदार अधिकारी तसेच नगराध्यक्ष व शिक्षण सभापती यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी विनंती भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक गोपाल कलाने यांनी 2 फेब्रुवारी रोजी पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून मागणी केली आहे.
संबंधितांवर गुन्हा दाखल होईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून न पाहता यामागे कोण आहे ? त्याची भूमिका काय ? शासकीय उर्दू शाळेत जर असे शिक्षण विद्यार्थ्यांना शिक्षक देत असेल तर याची निश्चितच चौकशी करून गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे असेही यावेळी महेश काळेश्वरकर म्हणाले. त्यांच्या समवेत भाजपाचे गटनेते विजय हरडपकर ,भाजपा शहर अध्यक्ष अतुल खंदारे, नगरसेवक अमोल तीवरंगकर , गोपाल कलाने, पवन मेंढे , बबलू मैड उपस्थित होते.


The game selection is amazing and I love how user friendly everything is. I had a great run last night! You guys should give vnga168 a try.
Really impressed with the variety of options available here. It feels very professional and the rewards are actually fair. I am sticking with kayaraya88 from now on.
The login process is super smooth and I rarely encounter any glitches. It makes the whole gaming session much more enjoyable. Highly recommend 17jililogin to everyone.