एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पूरक व्यवसाय करून शेतकऱ्यांनी आर्थिक विकास साधावा -डॉ . शरद गडाख कुलगुरू प्रतिनिधी उमरखेड: *२२ कर्तृत्ववान शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ व उद्योजकांचा* *भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराने सन्मान
एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पूरक व्यवसाय करून शेतकऱ्यांनी आर्थिक विकास साधावा -डॉ . शरद गडाख कुलगुरू
प्रतिनिधी
उमरखेड:
२२ कर्तृत्ववान शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ व उद्योजकांचा
भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराने सन्मान
उमरखेड :
शेतकरी हा सतत आपल्या अनुभवाच्या आधारे शेतीत नवे-नवे प्रयोग करणारा संशोधकच असतो. शेतकऱ्यांनी स्वतःच्या अनुभवातून आत्मसात केलेल्या तंत्रज्ञानावर त्यांचा ठाम विश्वास असतो. शेतकरी व शेती समृद्ध व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्रातील नामवंत प्रगतशील शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, कृषी उद्योजक, शेती वर लिखाण करणारे प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व कृषी विस्तारक एकत्र येऊन आपल्या शेतात यशस्वीरीत्या वापरलेले तंत्रज्ञान व अनुभव एकमेकांशी सामायिक करतात आणि त्याचा लाभ सर्वच शेतकऱ्यांना व्हावा, या हेतूने आयोजित केलेली ही कार्यशाळा सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. एकात्मीक शेती पद्धतीमध्ये शेतकन्यांना आपल्या मालाचा भाव आपल्याला ठरवता येतो आपल्या धान्यावर प्रक्रिया करून शेतकन्यांनी बाजारपेठ तयार करून आपली आर्थिक उन्नती करू शकतो . राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार अखंडीतपणे चालू ठेवावा असे मत कार्यक्रमाचे उदघाटक डॉ. शरद गडाख कुलगुरू डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी व्यक्त केले.
लोकनेते, सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त गेल्या २४ वर्षांपासून दरवर्षी जानेवारी महिन्यात ही कृषी कार्यशाळा व कृषी गौरव पुरस्कार सोहळा सातत्याने आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमातून शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, संशोधन, प्रक्रिया उद्योग, शेतीपूरक व्यवसाय व यशस्वी प्रयोगांची माहिती ट्रान्स्फर ऑफ टेक्नॉलॉजी या माध्यमातून थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले जात आहे.
यावेळी २६ कर्तृत्ववान शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, कृषी उद्योजक, शेतीवर लिखाण करणारे व कृषी विस्तारकांना ‘भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सत्कारमूर्तींनी आपल्या यशामागील अनुभव, संघर्ष आणि प्रयोगांची माहिती स्थानिक शेतकऱ्यांसमोर सादरीकरण करून त्यांच्या जवळ असलेले कौशल्य, कृषी विद्यापीठातील तंत्रज्ञान, पूर्वजांकडून मिळालेले पारंपरिक ज्ञान आणि त्यांच्या जवळचे अनुभव यांचा मिलाफ करून या ज्ञानाची देवाणघेवाण घडून आली.या वेळी डॉ. महेद्र ढवळे, पाडुरंग आवाड, कृष्णकुमार राठी, सुरेद्र नारखेडे, दिशा उदगीरकर, श्रीपत राठोड, अंकीता मोरे, मिलीद देशमुख, मनोज माळी, रविद्र मेटकर यां शेत कऱ्यांनी मनोगत व्यक केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नागेश आष्टीकर, आमदार किसनराव वानखेडे, डॉ. भारत बास्टेवाड, गणेश शिन्दे, शिवराम घोडके, अनिरुद्ध पाटील चोंढीकर, नितिन भुतडा, डॉ. विजयराव माने, मनोजकुमार ढगे, डॉ. लक्ष्मीकांत कलंत्री, विजय मुकाडे, डॉ. नितिन कोष्टी शास्त्रज्ञ, डॉ. श्रीकांन्त अमरशेट्टीवार, डॉ. संदीप कदम वासुदेव चांदुरकर, मयुर ढोले, बाबुराव पाथ्रडकर, माजी आमदार नामदेव ससाणे, तातू देशमुख, राम देवसरकर उपस्थीत होत
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी केले, तर उद्धव गायकवाड यांनी आभार मानले.
चौकट : पुरस्काराचे मानकरी
स्व. भाऊसाहेब माने जीवनगौरव पुरस्कार
डॉ. महेंद्र भीमराव ढवळे (उपसंचालक, रेशीम संचालनालय, नागपूर)
राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कारार्थी :
• कृषी पर्यटन – पांडुरंग भगवानराव तावरे (सिगणी, ता. बारामती)
• ऊस उत्पादक ते साखर उद्योजक – पांडुरंग साहेबराव आव्हाड (धाराशिव)
• अन्नप्रक्रिया उद्योग – श्रीकृष्णकुमार भवरलाल राठी (अकोला)
• दुग्ध उत्पादन – सौ. दिशा दिलीप उदगीरकर (अकोला)
• मुक्त संचार कुक्कुटपालन – कु. अंकिता राजेंद्र मोरे पाटील (जालना)
• कृषी उद्योग – रवींद्र माणिकराव मेटकर (अमरावती)
• नैसर्गिक शेती – बाबाजी बांगर (पुणे)
• रेशीम व चॉकी सेंटर – अजिंक्य वसंत कांबळे (पुणे)
• दुग्ध उत्पादक – गोविंद पवार (नांदेड)
• सेंद्रिय भाजीपाला – श्रीपत राठोड (नागपूर)
• एकात्मिक शेती – कृष्णराव देसट्टीवार (यवतमाळ)
• ड्रोन तंत्रज्ञान – सौ. पूजा अमोल जिनेवाड (यवतमाळ)
• ‘समुराई’ ब्रँड – संतोष देशमुख (माजी सैनिक, अकोला)
• वनीकरण व वृक्षसंवर्धन – सुरेंद्र नारखेडे (अकोला)
• कृषी प्रसार (दैनिक) – तीक्षगत वाघमारे (संपादक, अजिंक्य भारत, मुंबई)
• कृषी प्रसार – संतोष मुंडे (सीनियर रिपोर्टर, सकाळ ॲग्रोवन, संभाजीनगर)
• कृषी शास्त्रज्ञ – डॉ. मिलिंद. पंजाबराव देशमुख (पुणे)
• हळद शास्त्रज्ञ – डॉ. मनोज माळी (सांगली)
• कृषी शास्त्रज्ञ – डॉ. नितीन कोंडे (अकोला)
• बियाणे तंत्रज्ञान – डॉ. आम्रपाली आखरे (अकोला)
• कृषी विस्तार – डॉ. किशोर बिडवे (अकोला)
आदर्श शेतकरी प्रोत्साहन पुरस्कार (उमरखेड तालुका) :
सौ. वंदना सदानंद पांडे (खरबी), दत्ता भीमराव वानखेडे (सुकळी),
सतीश दिगंबर जामकर (पोफाळी), समाधान वानखेडे (खरुस)
चौकट :
“ही कृषी परिषद म्हणजे केवळ भाषण आणि सत्कार या पुरतेच मर्यादित नसून, येथे ज्ञान- अनुभव – कौशल्य आणि तंत्रज्ञानाचे देवाण घेवाण करून करार घडवणारे व्यासपीठ आहे.
डॉ. विजयराव माने
चेअरमन कृषी महाविदयालय, उमरखेड



