महिला दिनाचा सन्मान फक्त भाषणात नको कृतीत दाखवा जिजाऊ ब्रिगेड च्या वतिने SP कुमार चिंता यांना निवेदन उमरखेड तालुक्यात सुरू असलेले धंदे दारू जुगार, सट्टा व नशेच्या पदार्थांचे धंदे बंद करा उमरखेड
महिला दिनाचा सन्मान फक्त भाषणात नको कृतीत दाखवा जिजाऊ ब्रिगेड च्या वतिने SP कुमार चिंता यांना निवेदन
उमरखेड तालुक्यात सुरू असलेले धंदे दारू जुगार, सट्टा व नशेच्या पदार्थांचे धंदे बंद करा
उमरखेड
जिजाऊ ब्रिगेडच्या व तालुक्यातील महिलांच्या वतीने आपणास हे निवेदन सार करीत आहोत. ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महिलांचा सन्मान, सत्कार आणि गौरव केला जातो. परंतू वास्तव परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग आज अनेक कुटूंबातील महिला व्यसनाधिनतेच्या संकटामुळे मानसिक, आर्थिक आणि सामाजिक त्रास सहन करत आहेत.
तालुक्यात अनेक ठिकाणी अवैद्य दारू विक्री, जुगार, सट्टा, रेस तसेच नसेच्या पादार्थांचा उघडपणे व्यापार सूरू आहे. या अवैद्य धंद्यामुळे घरातील तरुण मुले व्यवनाच्या आहारी जात आहेत. अनेक कुटूंब उध्वस्त होत आहेत. घर चालविणाऱ्या महिलांना मारहान, अपमान, आणि असुरक्षीततेचा सामना करावा लागत आहे. याहुन गंभीर बाब म्हणजे शाळेतील अल्पवयीन मुलेही गांजा सारख्या नशेच्या विळख्यात अडकत असल्याचे चित्र दिसत आहे.
हे समाजासाठी आणि देशाच्या भविष्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. म्हणून आम्ही जिजाऊ ब्रिगेड व तालुक्याच्या वतीने आम्ही प्रशासनाला सांगू ईच्छीतो अवैद्य धंदे, दारू विक्री, जुगार, सट्टा, मटका व नशेचे सर्व धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत.
या अवैद्य धंद्यात सहभागी असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. युवकांना व्यसनाच्या विळख्यात ओढणाऱ्या टोळ्यांना तात्काळ नियंत्रणात आणावे.
महिलांचा सन्मान फक्त भाषणात आणि कार्यक्रमात नको तर प्रत्यक्ष कृतित दिसला पाहिजे. प्रत्येक घर सुरक्षीत राहिले पाहिजे, प्रत्येक आईचा संसार वाचला पाहिजे.
जर या गंभीर विषयावर प्रशासनाने तात्काळ लक्ष दिले नाही तर, जिजाऊ ब्रिगेड व तालुक्यातील महिलांना सोबत घेवून तिव्र आंदोलन करतील वेळ प्रसंगी आमरण उपोषणास बसतील. आपण या विषयाचा गंभीर विचार करून तात्काळ कार्यवाही करा असे निवेदन देताना
जिजाऊ ब्रिगेड प्रदेश सहसचिव सरोज देशमुख, तालुका अध्यक्ष शोभा राऊत, यशोदा सोनटक्के, रंजना सुरोशे, ललिता खंदारे, अरुणा राठोड, वंदना पानपट्टे गंगा, नंदा तावडे, अश्विनी भोकरे, रेखा भूत्ते गडदे,चक्र धर देवसरकर, विष्णु रणमले, स्वप्निल कनवाळे, दत्तराव भालेराव ,उपस्थितीत होते.


Just pure fun and excitement. The animations are great and the win rate seems better than other sites I used before. Having a blast at phjilifun right now.