भरधाव आयशरची ऑटोला भीषण धडक; १४ महिला मजुरांसह १६ जण जखमी उमरखेड–
भरधाव आयशरची ऑटोला भीषण धडक; १४ महिला मजुरांसह १६ जण जखमी
उमरखेड–ढाणकी रोडवर एमआयडीसीजवळ शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने ऑटोला जोरदार धडक दिल्याने १४ महिला मजुरांसह एकूण १६ जण जखमी झाले. त्यापैकी ७ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमरखेड परिसरातील शेतात हळद काढणीसाठी महिला मजूर ऑटो (क्र. सीजी ०४ एमटी १२२६) ने जात असताना ढाणकी रोडवरील एमआयडीसीजवळ समोरून येणाऱ्या आयशर (क्र. एमएच ४० बीएल ५१८०) ने प्रथम एका मोटरसायकलला धडक दिली व त्यानंतर समोरून येणाऱ्या ऑटोवर आदळली. धडक इतकी जोरदार होती की ऑटोमधील महिला मजूर जखमी झाल्या.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना बाहेर काढले. दरम्यान, संतप्त नागरिकांनी आयशर चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
या अपघातात मोटरसायकलस्वार लक्ष्मण किशन गायकवाड, बिजाबाई विठ्ठल झुंकेकर (६५), वर्षा सुरेश गायकवाड (३७), लक्ष्मी जयराम दिवेकर (६५), सुनीता मुकेश दिवेकर (३७), रेखा प्रभाकर शिंदे (४०), अर्चना नितीन जगताप (३७) यांच्यासह अन्य महिला मजूर जखमी झाल्या आहेत. सर्व जखमींना उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर नांदेड व यवतमाळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
या प्रकरणी पियअसाय योगेश जाधव व जमादार अमित निळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून आयशर व चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.


Love the variety of games available here. It keeps things exciting and the graphics are really crisp. I’m spending a lot of my free time on bdxx777 lately.
I really enjoy the variety of slots available here. The jackpots feel reachable and the vibe is just right. Big shoutout to ph16jili!
Finding a mobile friendly casino that actually works well can be tough but I hit the jackpot with this one. The app loads instantly and handles live dealer games perfectly. I appreciate how secure everything feels while I play. My new daily go to for fun. piabetmobil
This place has a great vibe and the bonuses are actually fair. I am really enjoying my time on inyooe777 lately.