महसूल विभाग ॲक्शन मोडवर महागावात अवैध गौण खनिज माफियांना इशारा; तहसीलदार अभय मस्के यांचे भरारी पथक मैदानात
महसूल विभाग ॲक्शन मोडवर
महागावात अवैध गौण खनिज माफियांना इशारा;
तहसीलदार अभय मस्के यांचे भरारी पथक मैदानात
महागाव
महागाव तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीचा धंदा करणाऱ्यांवर आता महसूल विभागाचा करडा बडगा उगारला जाणार आहे. अवैध वाळू, मुरूम, दगड आणि इतर गौण खनिजांची चोरी रोखण्यासाठी तहसीलदार अभय मस्के यांनी विशेष भरारी पथकाची स्थापना करत महसूल यंत्रणेला थेट ॲक्शन मोडवर आणले आहे.
तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत तहसीलदार मस्के यांनी मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांचा समावेश असलेले विशेष पथक तयार केले आहे. या पथकाला नियमित गस्त, नाकाबंदी, अचानक तपासण्या आणि संशयित वाहनांची पडताळणी करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
महसूल प्रशासनाच्या या धडक निर्णयामुळे अवैध गौण खनिज व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अनेकांचे धाबे दणाणले आहेत. भरारी पथकाच्या माध्यमातून तालुक्यातील संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, विनापरवाना उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईसह वाहन जप्तीची मोहीम राबविण्यात येणार आहे.
नागरिकांमधूनही या निर्णयाचे स्वागत होत असून, पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी महसूल विभागाने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. प्रशासनाच्या कडक भूमिकेमुळे अवैध गौण खनिज तस्करीवर प्रभावी नियंत्रण येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
—————— बॉक्स
तहसीलदार अभय मस्के
“महागाव तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. भरारी पथकाला नियमित तपासणी व कारवाईचे निर्देश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनीही अशा प्रकारच्या अवैध कामकाजाची माहिती प्रशासनाला द्यावी. महसूल विभाग कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहे.”
‘नो परमिट नो वाहतूक!’
महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे आता अवैध गौण खनिज माफियांसाठी तालुक्यातील रस्ते कठीण होणार असून, भरारी पथकाच्या कारवायांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Just had a massive win here and the withdrawal was processed almost instantly. It is hard to find sites this honest nowadays. Big thanks to pksv777 for the great service.
The deposit and withdrawal process here is a breeze. I love how quickly my funds hit the account. Great experience so far with krskrillcasino.