बनावट लग्न करून केली महिलेची फसवणूक व ८लोकांवर ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल पोलीस उपायुक्त प्ररी -४ मा सुधाकर पाठारे मा सहायक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड ठरले कर्तव्यनिष्ठ अधिकारी.
. बनावट लग्न करून केली महिलेची फसवणूक व ८लोकांवर ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल
पोलीस उपायुक्त प्ररी -४ मा सुधाकर पाठारे मा सहायक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड ठरले कर्तव्यनिष्ठ अधिकारी
उल्हासनगर : उल्हासनगर महानगर पालिकेच्या निवडणुकीत SC जातीचे महिला उमेदवार उभे करून आपल राजकीय हेतू साध्य करण्यासाठी सूडबुद्धीने मनसे पक्षातील पदाधिकारी मुकेश रामदास चव्हाण याने प्रेमाचं नाटक करून हॉस्पिटल नर्स म्हणून कार्यरत असणाऱ्या उल्हासनगर मध्ये राहणाऱ्या नवऱ्या सोबत ८वर्ष पासून विभक्त राहणाऱ्या महिलेला आपल्या अक्कल हुशारीने मी तुमचं लग्न झालं असताना तुम्हाला मुला सहित संसारिक सुख देईल.तुमच्याशी लग्न करेल तुमच्या नवऱ्या कडून तुम्हाला घटस्फोट मिळवून तुझ्या सोबत कायदेशीर विवाह करून संसार करेल. असे निराधार महिलेला प्रेमाचं आमिष दाखवून फिर्यादी जवळकी साधली पण येत्या उल्हास नगर महापालिकेत तुला SC आरक्षण पडल्यावर माझ्या पक्षातून निवडणूक लढावी लागेल तो पर्यंत आपल लग्न गुप्त आसेल तु महार जातीची असल्याने माझे परिवारातील सदस्य तुला स्वीकारणार नाही म्हणून लग्न झाल्या नंतर आपल नात गुप्त आसेल नाहीतर मला माझे घरचे आपल्या दोघांना वेगळे करतील मला तुला गमवयाच नाही . असे फिर्यादी विश्वास संपादन केला आहे. एकदा निवडणूक झाले तर मी त्यांना समजावेल पण मुकेश मुलीला फक्त आश्वासन देत असल्याने मुलीच्या घरच्यांनी मुकेश प्रेमाला विरोध केला २०१८ पासून मुकेश मुलीचा गैर फायदा घेत होता प्रेम प्रकरणाला मुलीच्या घरच्यांनी विरोध केला. मुकेश लक्षात आलं तेव्हा आपल राजकीय करियर नष्ट होता कामां नये . स्त्री पुन्हा आपल्या पहिल्या नवऱ्या कडे जाता काम नये फिर्यादी घटस्पोट झाले नसताना ह्याची कल्पना असताना देखील म्हणून सूडबुद्धीने मुकेश चव्हाण ने SC जातीच्या स्त्री सोबत बांद्रा जावून लग्न केले. काही दिवसांनी पीडित महिलेच्या पहिल्या पतीकडून मुलीवर दबाव टाकून घटस्फोट करून घेतला.
पण लॉक डाऊन मुळे निवडणूक पुढे गेल्याने मुकेश चव्हाण मानसिक खाच्चिकरण झालं त्याच प्रकरण उघडकीस येवू लागल त्या दरम्यान मुकेश चव्हाण व त्याच्या परिवारातील सदस्यनी मोठ्या सुरेश चव्हाण ची पत्नी सुनेला कोटुबिक अत्याचार करून हाकलून लावल होत.तिने जळगाव न्यायालयात दावा दाखल करून मुकेश चव्हाण,रामदास चव्हाण, ललिता चव्हाण,, स्वप्नील चव्हाण ,सुरेश चव्हाण ,विरुद्ध दोषी ठरवून पोडगी लागू केली निर्दशनास आल्याने SC जातीची महिला आपली घरची सुन होता कामा नये असे जातीय द्वेष शत्रुत्व मनात ठेवून मुकेश चव्हाण याने परिवार व सासरिल लोकांच्या मदतीने SC जातीच्या महिलेला अंधारात ठेवून गावी जावून लग्न केलं. असल्याचे फोटो मुकेश चव्हाण ने दुसऱ्या लग्नाचे फोटो इंस्टा ग्राम अपलोड केल्याने पीडित महिलेला मिळाले असता पीडित महिला जाब विचारणा साठी गेली तेव्हा मुकेश व त्याच्या पारिवारतील लोकांनी पीडित तू महार जातीची असल्याने तुझा वापर फक्त राजकीय हेतू साध्य करण्यासाठी माझ्या मुलाने केला आहे तू नीच जातीची आहे. भिकारी आहेस माझा मुलगा इंजिनियर आहे मनसे पक्षात मोठ्या पदावर आहे. १२ तोळे सोने ८लाख रोख एक स्कुटी हुंडा मिळाला सरपंच मुली सोबत लग्न करून दिले आहे. तुझी लायकी नाही आमच्या घरात नादायची म्हणून तू महार जातीची आहेस म्हणून जातीय द्वेष व शत्रुत्व मनात ठेवून पिढीतील घरातून हाकलून दिले. दुसऱ्या पतीनाला मुकेश पत्नी स्वीकारण्यास सर्व परिवार तयार होता.व पीडित महिलेला नवऱ्याच्या अधिकार द्वारे हक्क मिळू नये म्हणून पीडित ना हक त्रास देण्यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी वारंवार पोलीस स्टेशन अर्ज केले.तेव्हा पीडित तिच्या वर झालेल्या अन्याय बाबत मार्गदर्शन साठी युनिफाईड ह्युमन राईट्स कौन्सिल कडे धाव घेतली प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा अध्यक्ष ऍड स्वप्नील पाटील याच्या नेतृतवाखालील शैनाज खत्री मारिया खोत सोनी जयस्वाल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, डॉ आदर्श भालेराव सौ कल्पंना थोरात अस्लम सोयान ,फिरोज खान, दैनिक पुण्य विचार संपादक किरण पडवळ संपादक राहुल सावंत यांनी घटनेची योग्य दखल घेतली असताना लक्षात आले की आरोपीने आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी SC जातीच्या महिलेचा गैर वापर करून बनावट लग्न करून तिच्या सोबत गैव्यवहार सुधा करत होता तेव्हा विठ्ठल वाडी पोलीस स्टेशन मुकेश चव्हाण विरोधात फिर्यादी सोबत लेगिक अत्याचार केल्या बाबत जून २०२२मध्ये गुन्हा नोंद केला होता. तसेच आरोपी १ते९ आरोपीने मुकेश पाहिलं लग्न माहिती असताना देखील सूडबुद्धिने जातीय द्वेष मनात ठेवून दुसरे लग्न करून फिर्यादी बहिष्कार घातला त्यामुळे फिर्यादी सामाजिक प्रतिमा मलिन झाले. असे संगटनेच्या पदाधिकारी याच्या लक्षात आले असताना याच्या पाठपुराव्याने पोलीस उपायुक्त मा सुधाकर पाठारे याच्या निर्दशनास आणून दिले विलंब न लावता ,याच्या आदेश खाली सहायक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी विठ्ठल वाडी पोलीस स्टेशन गुन्हे क्र ०३८२/२०२२ भा द स कलम ,498A 494,417,323,109,504 अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 सुधारित कायदा कलम 3 (1) नुसार आरोपी नामे १) मुकेश रामदास चव्हाण २)रामदास चव्हाण ३)ललिता चव्हाण ४) सुरेश चव्हाण ५)स्वप्नाली चव्हाण ६)भावना चव्हाण ७)भीमराव जाधव इतर दोन जणा सह गुन्हा नोंद केला आहे. सदर आरोपी कुर्ला कॅम्प उल्हासनगर येथे राहत होता. पण सदर आरोपी फरार झाले आहेत. सदर फिर्यादी नुसार सद्या त्या गुन्ह्यात भा द स कलम 420,406,493,496,34 अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 सुधारित कायदा कलम 3(1)U 3(1)(ii) 3(1)(viii) बंधनकारक आहे. कलम वाढीव साठी पीडित महिलेने अप्पर पोलीस आयुक्त याच्याकडे मा न्यायालयात अर्ज सादर केला आहे. सदर याचा तपास सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड विठ्ठल वाडी पोलीस स्टेशन सपोनी बर्वे करत आहे. सदर आरोपी फरार आहेत.