उमरखेड येथे ईद ए मिलाद उत्साहात साजरी शहरात निघाला भव्य दिव्य जुलूस.

उमरखेड येथे ईद ए मिलाद उत्साहात साजरी
शहरात निघाला भव्य दिव्य जुलूस
उमरखेड/प्रतिनिधी : उमरखेड शहरात ईद ए मिलाद उर्फ मोहम्मद पैगंबर(स.) जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. यावेळी दरवर्षी निघणारा जुलूस यावेळेस हजारोच्या उपस्थित आठवडी बाजार परिसरातून निघाला. जुलूस असंख्य लोकांची उपस्थित होती.
सकाळी 9 वाजता हजरत तातार शाह बाबा यांच्या दर्गावर सिरत कमिटी तर्फे फुलांची मानाची चादर अर्पित करून फतेहा देऊन जुलूस आरंभ करण्यात आले. जुलूस मार्गक्रम होत असतांना अनेक सामाजिक संघटनानी पाणी, खिचडी, बिस्कीट चे वाटप केले. जुलूस शांततेत पार पडले असून पोलीस प्रशासनाने सहकार्य केले.
चौकट :
तांबोळी पुऱ्यात घडले हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
उमरखेड च्या प्रसिद्ध शिव मंदिरासमोरून जुलूस जात असतो. यावेळी उपस्थित हिंदू बांधवानी जुलूस मध्ये उपस्थिताना गुलाबाचे फुल देऊन ईद च्या शुभेच्छा दिल्या. उमरखेड शहरात हिंदू मुस्लिम बंधुभाव कायम रहावे या साठी शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संघटना नेहमी पुढाकार घेत असतात.
चौकट :
पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमुळे जुलूस बघण्यासाठी येणाऱ्या इतर गावातील अनेक युवकांचा झाला हिरमोड
उमरखेड शहरातील जुलूस हा यवतमाळ जिल्ह्यात प्रसिद्ध असून जुलूस बघण्यासाठी अनेक युवक या दिवसाची आतुरतेने वाट बघतात. जुलूस च्या दिवशी चुरमुरा फाट्यावर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी मुळे जुलूस बघण्यासाठी येणाऱ्यांना वापस पाठविण्यात आले. पोलिस प्रशासनानी कोणत्या कायद्या अंतर्गत युवकांना उमरखेड शहरात येण्यास मज्जाव केला? हे अद्याप गुलदसत्यातच आहे.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.
Real fantastic info can be found on website.Leadership
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me. https://www.binance.com/cs/register?ref=WTOZ531Y